Fridge storage dough: फ्रिजमध्ये मळून ठेवलेली कणीक किती दिवस वापरता येते?

Surabhi Jayashree Jagdish

मळून ठेवलेली कणीक

फ्रिजमध्ये मळून ठेवलेली कणीक किती दिवस वापरता येते हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. योग्य पद्धतीने कणीक ठेवलं तर कणीक काही काळ सुरक्षित राहू शकतेय पण जास्त दिवस ठेवल्यास ते खराब होतं.

dough shelf life

कणकेचा वास

कणकेचा वास, रंग आणि टेक्स्चर बदलत असेल तर ती वापरणं टाळावं. त्यामुळे कणीक किती दिवस ठेवायची आणि कधी वापरायची याबाबत अचूक माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे.

fridge storage dough

किती दिवस सुरक्षित राहते?

फ्रिजमध्ये मळलेली कणीक साधारण २४ ते ४८ तास सुरक्षित राहते. यापेक्षा जास्त वेळ ठेवल्यास तिची चव वेगळी लागू शकते. ३ दिवसांनंतर ती वापरणं आरोग्यासाठी योग्य मानलं जात नाही.

food safety tips

योग्य साठवणूक

कणीक नेहमी एअरटाइट डब्यात किंवा प्लास्टिक रॅपमध्ये घट्ट बंद करून ठेवा. यामुळे कणीक बाहेरील हवा आणि बॅक्टेरियापासून सुरक्षित राहतं. डब्यावर तारीख लिहून ठेवली तर किती दिवस झाले हे लक्षात ठेवता येतं.

dough freshness

खराब झालेली कणीक कशी ओळखावी?

कणकेचा वास आंबट किंवा विचित्र येत असेल तर ती खराब झालेली असते. तिचा रंग गडद किंवा हिरवट दिसत असल्यास वापरू नका. कणीक चिकट किंवा खूप मऊ झालेली वाटत असेल तरी ती टाकून द्या.

kitchen tips

जास्त दिवस ठेवल्यास?

जास्त वेळ ठेवलेल्या कणकेत बॅक्टेरिया वाढू शकतात. यामुळे पोटदुखी, अ‍ॅसिडिटी किंवा फूड पॉइजनिंगचा धोका वाढतो. म्हणून जुनी कणीक वापरणं टाळलं पाहिजे.

food storage guide

वापरण्यापूर्वी काय करावं?

फ्रिजमधून कणीक काढल्यानंतर ती काही वेळ रूम टेम्परेचरला ठेवा. नंतर ती पुन्हा हलकीशी मळून घ्या, त्यामुळे तिचा पोत सुधारतो. जर कणीक कोरडी वाटत असेल तर थोडं पाणी घालून मऊ करा.

how long dough lasts

उन्हाळ्यात विशेष काळजी

उन्हाळ्यात कणीक लवकर खराब होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून शक्यतो एका दिवसातच ती वापरणं उत्तम आहे.फ्रिजचं तापमान योग्य ठेवणंही खूप महत्त्वाचं आहे.

dough preservation

Raigad fort history: रायगड किल्ल्याचं अद्भुत रहस्य! नगरखान्यातील आवाज दरबारात बसलेल्या महाराजांपर्यंत कसा पोहोचायचा?

Raigad fort history | saam tv
येथे क्लिक करा