Manasvi Choudhary
प्रत्येकांची सकाळची सुरूवात ही गरमागरम चहा पिऊन होते. अनेकांना ऋतू कोणताही असो सकाळी चहा पाहिजेच असतो. अनेकजण चहा पिऊनच कामाला सुरूवात करतात.
चहा प्यायल्याने शरीर फ्रेश होते. दिवसाची सुरूवात चांगली होते. संपूर्ण दिवस ताजेतवाने वाटते.
मात्र उन्हाळ्यात चहा प्यावा की नाही? आरोग्यासाठी त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत हे जाणून घेऊया.
उन्हाळ्यात तापमान हे उष्ण असते यामुळे शरीर हायड्रेट राहणे गरजेचे असते. यामुळे उन्हाळ्यात चहा प्यायल्याने शरीरातील उष्णता वाढण्याची शक्यता अधिक असते.
उन्हाळ्यात चहाचे सेवन केल्याने पोटातील उष्णता वाढू शकते यामुळे आम्लपित्त, बद्धकोष्ठता आणि अपचन यासमस्या उद्भवतात.
चहामधील कॅफिनमुळे भूकेवर परिणाम होतो. भूक लागत नाही. उन्हाळ्यात चहाचे सेवन केल्याने झोपेवर परिणाम होते. उन्हाळ्यातील उष्णतेमुळे हा परिणाम आणखी वाढू शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.