Runny nose in cold yandex
लाईफस्टाईल

Frequent cold: नेहमी सर्दी होण्याचं हे १ माहीत नसलेलं विचित्र कारण, वाचून अचंबित व्हाल!

आजकाल सर्दी झाली की लोकं समाजात काहीही काळजी न घेता वावरताना दिसतात. सध्या सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन्स सर्दीच्या रूपात होताना दिसतंय.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या वातावरणातील बदलामुळे आजाराचं प्रमाण वाढलं आहेत. सर्दी - खोकला तर इतके सामान्य झाले आहेत की त्याचा विचार देखील फारसा केला जात नाही. आजकाल सर्दी झाली की लोकं समाजात काहीही काळजी न घेता वावरताना दिसतात. सध्या सगळीकडे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन्स सर्दीच्या रूपात होताना दिसतंय.

सध्या जास्त खोकला, कोणाचं नाक वाहणं, कोणाची छाती जड होणं, कुणाला श्वास घ्यायला त्रास होणं यांसारखे त्रास दिसून येतात. मात्र ही सर्दी सतत का होते, असा कधी आपण विचार केला आहे का? कदाचित यामध्ये अशा कारणांचा समावेश असेल जी आपल्याला माहिती नसतील.

का होते सतत सर्दी?

ऋतुमध्ये बदल झाला की आरोग्य बिघडतं. ऋतुबदलाच्या वेळी तापमानात बदल होतात आणि त्या काळात फुलणाऱ्या फुलांमधील परागकण यामुळे सर्दी होण्याची शक्यता वाढते. याशिवाय वातावरणातील धुकं, धूळ यांच्याशी आपला संपर्क आला की सर्दी होते.

सकाळी स्नान करण्याच्या पाण्याने देखील तुम्हाला सर्दी होऊ शकते. गार पाण्याने स्नान केलं, फार गार वाऱ्यात बसले, रात्री फार जागरण केलं इतकंच नाही तर दिवसा झोपलं तरी सर्दी होऊ लागते. याशिवाय वेगवेगळ्या जागेचं पाणी प्यायल्याने सर्दी होताना दिसते.

रागवल्यामुळे किंवा जास्त बोलल्यानेही सर्दी होऊ शकते हे तुम्हाला माहितीये का? जास्त बोलल्यामुळे, अति मैथुनामुळे, रागावल्यामुळे, खाल्लेलं अन्न न पचल्यामुळे, मल-मूत्र-जांभई-अश्रू वगैरे वेग अडवल्यामुळे आणि वातावरणात असलेल्या वेगवेगळ्या बॅक्टेरियांमुळे सर्दी होऊ शकते.

यावर कसे उपचार कराल?

  • गार वाऱ्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सुती कपडे, शाल, स्वेटर यांचा वापर केला पाहिजे. यावेळी डोक्याला आणि नाकाला नक्की झाकलं पाहिजे.

  • सर्दी झाल्यास पचायला सोपं तसंत ताजे आणि स्निग्ध जेवणं घेणं योग्य आहे.

  • आहारात जव, जुने तांदूळ, कुळीथ, हिरवे मूग, मिरी, तूप, भाज्यांचं गरम सूप, लसूण, सैंधव मीठ, आले, पुदिना, कोथिंबीर, दालचिनी तमालपत्र वगैरे गोष्टी नक्की ठेवाव्या.

  • जेवण नेहमी गरम जेवावं. शक्यतो गरम पाणी जास्त उत्तम.

  • घरच्या घरी, शक्य झाल्यास पाण्यात निलगिरी तेलाचे २-३ थेंब घालून वाफारा घ्यावा.

  • छोट्या रुमालात ओवा बांधून केलेली पुरचुंडी लोखंडाच्या गरम तव्यावर गरम करून सायनस, गळा व छाती शेकण्याचा फायदा होताना दिसतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: या आठवड्यात मोठे खर्च करण्याची तयारी ठेवा; वाचा साप्तहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवे अध्यक्ष रोहित पवार

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसली, धावत्या बसमध्ये शारीरिक संबंध; VIDEO व्हायरल करत प्रवाशांनी झापलं

Dhodhadi Waterfall: मुंबईपासून फक्त साडेतीन तासांच्या अंतरावर आहे हा सुंदर धबधबा, पुढचा प्लान इथे नक्की करा

Child Brain Health : लहान मुलांना हे पदार्थ देताय? सावधान! अन्यथा मेंदूवर होईल परिणाम

SCROLL FOR NEXT