ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऑनलाइन शॉपिंग करणे सोपे असले तरी, ऑनलाईन शॅापिंग करीत असताना स्कॅमचा धोका मोठ्या प्रमााणात वाढला आहे.
थोडीशी निष्काळजीपणा देखील तुमचे नुकसान करू शकते, फसवणूक करणारे तुम्हाला बनावट वेबसाइट आणि डीलद्वारे केव्हाही फसवू शकतात.
Flipkart, Amazon सारख्या विश्वसनीय साइट्सवरून खरेदी करा. अज्ञात लिंक्सवर क्लिक करू नका.
ज्या साइट्सवरून खरेदी करणार असाल त्या वेबसाईटची सुरुवात https ने असावी.
एखाद्या साइटवरून जर तुम्ही पहिल्यांदा खरेदी करित असाल तर, कॅश ऑन डिलेव्हरीचा पर्याय निवडावा.
जर तुम्हाला बक्षीस जिंकल्याबद्दल एखादा अनोळखी मेसेज किंवा कॉल आला तर त्वरित फोन बंद करा आणि मेसेज डिलीट करा.
प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी, कृपया वापरकर्त्यांचे रिव्ह्यू आणि रेटिंग तपासा.