उन्हाळ्याच्या दिवसांत आपण आपल्या त्वचेची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतो. यावेळी सूर्याच्या किरणांमुळे त्वचेला हानी पोहोचून नये यासाठी आपण सनस्क्रीनचा वापर करतो. मात्र सनस्क्रीनबाबतच्या एका चुकीमुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो हे तुम्हाला माहितीये का? प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ डॉक्टर एड रॉबिन्सन यांच्या सांगण्यानुसार, लोकं त्यांच्या सनस्क्रीनला बाथरूममध्ये ठेवतात. मात्र यामुळे सनस्क्रीन तुमच्या त्वचेला योग्य प्रमाणात सुरक्षा देऊ शकत नाही.
साधारणपणे बाथरूममध्ये उष्ण आणि दमट वातावरण असतं. यामुळे सनस्क्रीनमधील एक्टीव्ह घटकांचे विघटन होऊन त्यांचा प्रभाव कमी होतो. याचा तुम्ही ज्यावेळी बाहेर जाता तेव्हा सनस्क्रीन लावलं तरी ते तुमच्या त्वचेचं सूर्यापासून संरक्षण करू शकणार नाही. यामुळे सनबर्न, त्वचा आणि अगदी त्वचेच्या कॅन्सरचा धोकाही वाढतो.
डेली मेलच्या वृत्तानुसार, डॉ. एड रॉबिन्सन म्हणाले की, सनस्क्रीन थेट सूर्याच्या प्रकाशापासून आणि उष्ण ठिकाणांपासून दूर ठेवलं पाहिजे. बाथरूममध्ये, कारच्या डॅशबोर्डवर, खिडक्यांजवळ सनस्क्रीन ठेवणं हानिकारक ठरू शकते. या ठिकाणी तापमानातील चढउतार सनस्क्रीनमधील एक्टिव्ह घटक नष्ट करू शकतात.
जर सनस्क्रीन काहीशी घट्ट किंवा त्यामध्ये गुठळ्या झाल्या असतील तर याशिवाय तिला दुर्गंधी आली, तर ते वापरण्यासाठी योग्य नाही. असे प्रो़डक्ट्स त्वचेचं सूर्यापासून संरक्षण करत नाहीत. शिवाय अशी सनस्क्रिन त्वचेसाठी घातक ठरते.
सनस्क्रीन योग्यरित्या लावल्यास त्याचा प्रभाव चांगला पडू शकतो. त्यामुळे तुम्ही सनस्क्रीन कधी लावताय हे देखील महत्त्वाचं आहे. घराबाहेर जाण्यापूर्वी किमान १५ मिनिटं आधी सनस्क्रीन लावा आणि सूर्यकिरणांच्या संपर्कात येणार्या शरीराच्या प्रत्येक भागावर जसं की ओठ, कान, मानेच्या मागच्या बाजूला आणि हातांच्या मागच्या बाजूला पूर्णपणे लावा. दर दोन तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावणं आवश्यक आहे.
बहुतेक लोक सनस्क्रीन पुन्हा लावत नाहीत, तर काही जण कमी मात्रेत सनस्क्रीनचा वापर करतात. कान, मान आणि पाय यासारख्या भागांकडे दुर्लक्ष करणंही योग्य नाही. अशा छोट्या चुकांमुळे तुमच्या त्वचेचं मोठं नुकसान होऊ शकतं.
डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.