Stale Rice: तुम्हीही रात्रीचा शिळा भात खात असाल तर व्हा सावध; तुम्हीही विचारही केला नसेल इतका ठरतो धोकादायक

Effects of Eating Stale Rice: तुम्हीही रात्रीचा उरलेला शिळा भात दुसऱ्या दिवशी खाता का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. यामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे कोणता त्रास होईल ते पाहूयात.
Effects of Eating Stale Rice
Effects of Eating Stale Ricesaam tv
Published On

रात्री उरलेला भात तुम्हीही दुसऱ्या दिवशी खाता का? अनेकदा आपण शिळ्या भाताला सकाळी फोडणी देऊन मस्त चटपटीत फोडणीचा भात बनवतो. चवीला एकमद उत्तम लागणारा हा भात जवळपास प्रत्येकाला आवडतो. मात्र तुम्हाला माहितीये का शिळा भात तुमच्या आरोग्याचं मोठं नुकसान करतोय.

फोडणीच्या भातासोबत शिळ्या भातापासून बनवलेला फ्राईड राईस चवीला चविष्ट लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का की तो तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतो? पुन्हा गरम केलेला भात खाल्ल्याने काय नुकसान होऊ शकतं याचा तुम्ही विचार तरी केलाय का. आज या आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेऊया की शिळा भात खाल्ल्याने काय त्रास होऊ शकतो.

फुड प्वॉयझनिंग

रात्रीचा शिळा भात पुन्हा गरम करून खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते. कारण शिळ्या भातामध्ये बॅसिलस सेरियस बॅक्टेरिया वाढू लागतात. त्यामुळे जुना किंवा शिळा भात खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होण्याची समस्या उद्भवू शकते.

Effects of Eating Stale Rice
Quit Chapati: महिनाभर चपाती न खाल्ली नाही तर? पाहा शरीरामध्ये कसे बदल होतात

आतड्यांवर परिणाम

भात पुन्हा गरम करून खाल्ल्याने त्यामधील सर्व पोषक घटक नष्ट होतात. पोषक तत्वांशिवाय भात पचायला कठीण असतो, ज्याचा तुमच्या आतड्यांवर वाईट परिणाम होतो. आतड्यांमध्ये घाण जमा होऊ लागते ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

गॅसेसचा त्रास

शिळा भात खाण्याता सल्ला डॉक्टरही देत नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शिळा भात खाल्ल्यामुळे गॅसेसची समस्या जाणवू लागते. शिळा भात गरम केल्यानंतर खाल्ल्याने पचनसंस्था कमकुवत होते, ज्यामुळे पोटात गॅसची समस्या उद्भवू शकते.

Effects of Eating Stale Rice
Blockages in arteries: शरीरातील रक्तवाहिन्या बंद झाल्यास पायांमध्ये सकाळी दिसतात 'हे' मोठे बदल, कसे कराल उपाय

२ तासांचा आत करावं सेवन

भात शिजवल्यानंतर तो २ तासांच्या आत खाल् गेला पाहिजे. २ ते ३ तासांनंतर तांदूळ थंड होऊ लागल्यावर त्यात बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे भात ताजा असल्यास शरीरासाठी धोकादायक नसतो.

Effects of Eating Stale Rice
Gas Pain : नसांमध्ये का तयार होतो गॅस? शरीरातील विविध भागात होऊ लागतात तीव्र वेदना

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com