High Cholesterol saam tv
लाईफस्टाईल

High Cholesterol: हृदयाच्या नसांमध्ये जमलेलं कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळवेल ही लसणाची चटणी; बनवण्याची पद्धत आताच लिहून घ्या

Garlic chutney for cholesterol: वाढलेलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी लसूण आहारात समाविष्ट करता येतो. लसणातील एलिसिनसह काही घटक LDL कोलेस्ट्रॉलवर परिणाम करू शकतात. लसणाची चटणी कशी बनवावी, किती प्रमाणात खावी आणि कोणती काळजी घ्यावी, ते पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

कोलेस्ट्रॉल हा शरीरासाठी आवश्यक असलेलं एक प्रकारचा फॅट आहे. मात्र शरीरात त्याचं प्रमाण जास्त झालं तर हार्ट अटॅक, उच्च रक्तदाब आणि इतर आरोग्याच्या समस्या होण्याचा धोका वाढू शकतो. आजकालची धावपळीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वाढलेलं कोलेस्ट्रॉल ही अनेकांसाठी समस्या बनलीये.

अशावेळी आहारात काही आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं. लसूण हा त्यापैकीच एक पदार्थ आहे. जेवणाची चव वाढवणारी लसूण आरोग्यासाठीही उपयोगी मानला जाते. लसणामध्ये असलेले काही घटक कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम करू शकतात. त्यामुळे लसूण आहारात कसा समाविष्ट करायचा हे जाणून घेऊया

लसूण कोलेस्ट्रॉल कमी करण्यास कसं मदत करेल?

लसणामध्ये एलिसिन नावाचा घटक आढळतो. लसूण चिरताना किंवा ठेचताना हा घटक तयार होतो. लसणातील काही घटक शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे योग्य प्रमाणात लसूण आहारात घेणं फायदेशीर ठरू शकतं. लसूण रक्ताभिसरणासाठीही मदत करू शकतो. याचा फायदा हृदयाच्या आरोग्यासाठी होऊ शकतो.

लसणामध्ये सूज कमी करणारे म्हणजेच अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मही आढळतात. शरीरातील अनावश्यक सूज कमी ठेवण्यासाठी हे गुणधर्म मदत करू शकतात. रक्तवाहिन्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीही ही बाब महत्त्वाची आहे. कोलेस्ट्रॉलचं मॅनेजमेंट करण्यात लिव्हरची महत्त्वाची भूमिका असते. लसणातील काही घटक लिव्हरसाठी फायदेशीर ठरतात. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून लसणाचा वापर केला जाऊ शकतो.

लसूणाची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

लसूणाची चटणी बनवण्यासाठी १० ते १२ लसणाच्या पाकळ्या, अर्धा कप चिरलेली कोथिंबीर, २ ते ३ हिरव्या मिरच्या, १ मोठा चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, अर्धा छोटा चमचा जिरेपूड आणि १ मोठा चमचा ऑलिव्ह ऑईल किंवा मोहरीचं तेल घ्या.

चटणी बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम लसणाच्या पाकळ्या सोलून स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि मीठ घाला. हे सर्व बारीक वाटून घ्या. चटणी जास्त घट्ट वाटत असेल तर त्यात थोडंसं पाणी घालू शकता.

आता या मिश्रणात लिंबाचा रस, जिरेपूड आणि तेल घालून सगळं नीट एकत्र करा. काही मिनिटांत तुमची लसूणाची चटणी तयार होईल. ही चटणी पोळी, पराठा किंवा डाळ-भातासोबत खाता येते.

चटणी आहारात कशी घ्यावी?

लसणाची चटणी सकाळच्या नाश्त्यासोबत किंवा दुपारच्या जेवणात थोड्या प्रमाणात घेता येऊ शकते. मात्र लसूण प्रत्येकाला सारखा मानवेलच असं नाही. जास्त प्रमाणात लसूण खाल्ल्यास काही लोकांना पोटात जळजळ, अॅसिडिटी किंवा पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो. त्यामुळे चटणी योग्य प्रमाणातच खाणं चांगलं.

लसूण हा आरोग्यदायी आहाराचा एक भाग असू शकतो. मात्र, केवळ लसूणाची चटणी खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल कमी होईल असं नाही. वाढलेलं कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asangaon Tourism : वीकेंडला कुठे जायचं? आसनगावजवळची ५ सुंदर ठिकाणं देतात निसर्गाचा भन्नाट अनुभव

Maharashtra News Live Update: १० सप्टेंबर रोजी पुण्यातील साउंड व्यवसायिक मोर्चा काढण्याच्या तयारीत

Pune Dry Day : पुण्यात 'या' ५ महत्त्वाच्या दिवशी दारू विक्री पूर्णपणे बंद, उत्पादन शुल्क विभागाचे आदेश

Deepika-Ranveer : दीपिकानं फ्लॉन्ट केला बेबी बंप; दुआच्या क्युट स्माईलने वेधलं लक्ष, फोटोंनी इंटरनेटवर घातला धुमाकूळ

5 Weight Loss Drinks: वजन कमी करायचंय? चहा-कॉफीऐवजी 5 हेल्दी ड्रिंक्स ट्राय करा

SCROLL FOR NEXT