Dangerous Habits  Saam TV
लाईफस्टाईल

Dangerous Habits : आयुष्य उध्वस्त करणाऱ्या ५ सवयी कोणत्या आहेत? वाचा आणि सावध व्हा

This Habits Destroy Your Life : साध्या साध्या वाईट सवयी ओके असतात. मात्र या सवई गंभीर असल्यास आपल्यामुळे दुसर्‍या व्यक्तींना देखील अडचणींचा सामना करावा लागतो.

Ruchika Jadhav

आपले आयुष्य आपण कोणत्या पद्धतीने जगत आहोत याची माहिती आणि ज्ञान प्रत्येक व्यक्तीला असले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला विविध सवयी असतात. यातील काही चांगल्या आणि काही सवई वाईट सुद्धा असतात. या सवयी योग्य वेळेत ओळखता आल्या नाही तर संपूर्ण आयुष्य उध्वस्त होण्याची शक्यता असते. साध्या साध्या वाईट सवयी ओके असतात. मात्र या सवई गंभीर असल्यास आपल्यामुळे दुसर्‍या व्यक्तींना देखील अडचणींचा सामना करावा लागतो.

उत्साहात वाईट काम करणे

एखाद्या व्यक्तीच्या मार्गात अडचणी आणणे. म्हणजे हत्या, चोरी अशी कामे होय. ज्या व्यक्ती मोठ्या आनंदात आणि उत्साहात अशी कामे करतात त्यांच्या आयुष्यातील अडचणी पुढे वाढत जातात. वाईट काम मोठ्या आनंदात करणाऱ्या व्यक्तीला त्या त्या क्षणापुरते सुख मिळते. मात्र त्याचा उलट परिणाम त्यांच्याच आयुष्यावर होत असतो.

स्वत:चे कौतुक करणे

काही व्यक्तींचा स्वभाव असा असतो की, ते सतत स्वत:चे कौतुक करतात. स्वत:मधील कमीपणा या व्यक्ती दुसऱ्यांसमोर आणत नाहीत. स्वत:चे कौतुक करण्यामध्ये या व्यक्ती इतक्या मग्न असतात की त्यांची बुद्धी भ्रष्ट होते आणि त्यांचं आयुष्य उध्वस्त होतं.

क्रोध

राग प्रत्येकालाच येतो. मात्र काही व्यक्ती कोणत्याही कारणावरून रागवतात. शुल्लक आणि छोट्या गोष्टींवर जास्त राग व्यक्त करतात. अशा व्यक्ती अतिशय मूर्ख स्वभावाच्या असतात. त्यांना चांगले वाईट काहीच समजत नाही. या स्वभावाच्या व्यक्ती सतत आपल्या विषयी चांगला विचार करणाऱ्या व्यक्तींना दुखवत असतात.

दुसऱ्याची मदत न करणे

काही व्यक्तींचा स्वभाव असा असतो की ते दुसऱ्या व्यक्तीला कधीच मदत करत नाहीत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काही ना काही संकट असणारे प्रसंग ओढावतात. संकट समयी आपण स्वत:चा जीव वाचवला पाहिजे. मात्र असे करताना आपण आपल्याबरोबर दुसऱ्या व्यक्तींना देखील मदत केली पाहिजे. मात्र काही व्यक्ती फक्त स्वत:चा विचार करतात. दुसऱ्या व्यक्तींना अजिबात मदत करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढतात.

ताकदीचा दिखावा करणे

प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनात जगत असताना अनेक माणसांना भेटतात. त्यात प्रत्येकाला पोलीस अधिकारी, वैद्यकीय यांसह राजकीय वर्तुळात आपली ओळख असावी असं वाटतं. किंवा या ठिकाणी स्वत:चं अस्तित्व निर्माण करण्याचा बरेच जण प्रयत्न करतात. मात्र काही व्यक्ती त्यांच्याकडे ओळख आणि ताकद दोन्हीही नसताना याचा फक्त दिखावा करतात. हा दिखावा त्यांच्या अधोगतीचं मुख्य कारण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT