सोशल मीडियावर अनेक अपघातांचे थरारक व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रवास करताना आपला निष्काळजीपणा आपल्या जीवाशी बेतु शकतो आणि अपघातात आपण जीवही गमावून बसू शकतो. याचा प्रत्यय आपल्याला बऱ्याचदा येतो. अशातच सोशल मीडियावर धावत्या ट्रेनच्या छतावर तरुणांचा जिवघेणा प्रवास करतानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
व्हायरल व्हिडीओ आपण पाहु शकतो की, एका धावत्या ट्रेनच्या छतावर काही लोक बसून प्रवास करत आहेत. त्याचां हा जिवघेणा प्रवास मोठ्या अपघाला निमंत्रण देत आहे. तरीहीजीवाची पर्वा न करता बिनधास्त ते ट्रेनच्या छतावर बसलेले आहेत.
तेव्हाच दुसऱ्या बाजुच्या पटरीवरून ही मालगाडी येत आहे. यामुळं शेवटला या दोन ट्रेनची धडक होते अस वाटतं. जर दोनही ट्रेनची जर धडक झाली असती तर भंयकर अपघातही झाला असता. हा व्हिडीओ ट्रेनच्या छतावर बसलेल्या एका प्रवाशाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.
@khandakar17 या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. व्हायरल होत असलेला व्हिडीओ बांग्लादेशातील आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स हैराण झालेत. रेल्वेतून प्रवास करताना कधी रेल्वेच्या दरवाजातून पडुन अपघात होतात तर कधी रेल्वेच्या धडकेत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. तरीही असा जीवघेणा प्रवास लोक करतच आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्यात. अनेक यूजर्संनी म्हटले की, अशावर रेल्वे पोलिसांनी कारवाई करावी, तर एका यूजर्संनी म्हटल की हे काही नवीन नाही हा प्रवास रोजचा आहे. तर काहींनी रेल्वे प्रशानच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला आहे. आणखी यूजर्संनी संताप व्यक्त केलाय. बऱ्याच नेटकऱ्यांनी कोणत्यातरी 'अॅक्शन मुव्हीचे ' शुटीगं चालू असल्याच्या गंमतीदार प्रतिक्रिया केल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.