Mental Health Saam TV
लाईफस्टाईल

Mental Health : 'या' पाच गोष्टींमुळे बिघडू शकते मानसिक स्वास्थ, वेळीच काळजी घ्या आणि हे उपाय करा

Mental Health : वाईट सवयी तुमचं मानसिक आरोग्य बिघडवू शकतात. एका सर्वेक्षणानुसार ही बाब समोर आली आहे. तुमचं आरोग्य बिघडलं तर तुमच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

Apurva Kulkarni

मानसिक स्वास्थ सुदृढ बनवणं हे तुमच्या आरोग्यासाठी आणि जीवनासाठी खूप महत्वाचं आहे. एका सर्वेनुसार काही सवयी तुमचं मानसिक स्वास्थ बिघडू शकतात. वेळीच काळजी घ्या आणि हे उपाय करा.

तुमचं मानसिक स्वास्थ ही तुमच्या आयुष्यातील महत्वपूर्ण गोष्ट आहे. परंतु तुमच्या वाईट सवयी तुमचं मानसिक आरोग्य बिघडवू शकतात. एका सर्वेक्षणानुसार ही बाब समोर आली आहे. तुमचं आरोग्य बिघडलं तर तुमच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुम्हाला मोठ्या आजाराला समोरं जावं लागू शकतं. त्यामुळे वेळीच काळजी घ्या.

मानसिक स्वास्थ बिघडण्याची ही आहेत कारणे -

1. ताणतणाव आणि चिंता

जास्त ताणतणाव आणि चिंता तुमचं मानसिक स्वास्थ खराब करू शकते. कामाचा ताण, कौटुंबिक समस्या, पैश्याच्या समस्या यामुळे तुमचा ताणतणाव वाढू शकतो. यापासून वाचण्यासाठी रोज व्यायाम करा, मेडिटेशन करा, तसंच स्वत:साठी वेळ काढा.

2. झोपेची कमी

तुमची झोप कमी झाली असेल तर त्याचा परिणाम तुमच्या शारिरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. पुरेशी झोप झाली नाही तर चिडचिड, थकवा यासारख्या समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळं 7 ते 8 तास पुर्ण झोप घेणं गरजेचं आहे. तसंच झोपण्यापूर्वी मोबाईल, टिव्ही पासून दारू राहा त्यामुळे तुम्हाला वेळेत झोप लागेल.

3. फास्ट खाण्याची सवय

फास्टफूड खाणं हे शारिरीक तसंच मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. पालेभाज्या, फळं, घरच्या पौष्टिक अन्न खा. ज्यामुळे तुमचं आरोग्य वेवस्थित राहील.

4. एकटेपणा

तुमचं मानसिक स्वास्थ बिघडण्याचं मुख्य कारण आहे एकटेपणा. एकटं न राहता मित्रपरिवारासोबत वेळ घालवा. ज्यामुळे तुमचा एकटेपणा दूर होईल आणि तुम्ही खूश राहाल.

5. नकारात्मक विचार

नकारात्मक विचार बंद केले तर तुमचं आयुष्य अधिक सुंदर बनेल. तुमचं आरोग्य सकारात्मक विचाराने सुदृढ राहिल. त्यामुळे वेळीच काळजी घ्या आणि नकारात्म विचार करणं बंद करा.

- मानसिक स्वास्थ बिघडू नये यासाठी उपाय :-

1) रोज न चुकता व्यायाम करा. त्यामुळे तुमची एकग्रता वाढेल आणि तुमचं आरोग्य निरोगी राहील.

2) पुर्ण झोप घ्या, तसंच पौष्टिक अन्न खा. ज्यामुळे तुमचं आरोग्य सुदृढ राहील.

3) कुटुंब तसंच मित्रपरिवारासोबत वेळ घालवा. त्यामुळं तुमचा एकटेपणा दूर होईल.

4) नकारात्मक विचार दूर करून सकारात्मक विचार करा. ज्यामुळे तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी सकारात्मक घडतील.

5) स्वत:चा विचार करा, आणि स्वतच्या आरोग्यची वेवस्थित काळजी घ्या, त्यामुळं तुमचं मानसिक स्वास्थ अधिक चांगलं राहिल.

डिस्क्लेमर - सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलासाठी डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, भरधाव ट्रक घरात घुसला

Influencer Anita Bishnoi: रडत लाईव्ह आली अन् उचललं टोकाचं पाऊल; इन्फ्लुएंसर अनीता बिश्नोईचा लाईव्हमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

New Highway: २४२०० कोटींचा महामार्ग, ४ राज्यातून जाणार; मोदी सरकारचा मास्टरप्लान, कुणाला होणार फायदा?

एका महिन्यात कंबरेपर्यंत वाढतील तुमचे केस, हा देसी उपाय करून बघा

Shocking : नवी मुंबईत भयंकर घडलं! १७ वर्षीय दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार, पीडिता ४ महिन्यांची गरोदर

SCROLL FOR NEXT