bedroom vastu tips saam tv
लाईफस्टाईल

Vastu Tips For Bedroom: तुमच्या नात्याच्या बर्बादीचं कारण बनू शकतात बेडरूममधील 'या' गोष्टी; तुम्हीही करत असाल चूक तर सावध व्हा!

Surabhi Jagdish

वास्तू नेहमी तथास्तु म्हणते, असं म्हटलं जातं. वास्तूशास्त्रात प्रत्येक वस्तूचं स्वत:चं असं महत्त्व आहे. यानुसार त्या संबंधित वस्तूमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेच वास असल्याचं म्हटलं आहे. वास्तू शास्त्रानुसार, काही वस्तूंमधून सकारात्मक उर्जेचा संचार घरात होतो असं सांगितलं आहे. ज्याप्रमाणे हिंदू धर्मात ज्योतिष्य शास्त्राला महत्त्व आहे, त्याचप्रमाणे वास्तू शास्त्राला देखील महत्त्व देण्यात आलंय.

वास्तू शास्त्रानुसार, घरात असलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये कोणती ना कोणती एनर्जी असते, ज्याचा प्रभाव आपल्यावर दिसून येतो. त्यामुळे शास्त्रानुसार, या गोष्टी शास्त्रामध्ये दिलेल्या नियमांनुसार ठेवल्या पाहिजेत.

घरातील बेडरूमबाबत देखील काही नियम वास्तू शास्त्रामध्ये दिले आहेत. या नियमांनुसार, अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुमच्या बेडरूममध्ये नसाव्यात किंवा त्या योग्य दिशेला असल्या पाहिजेत. जर या गोष्टी चुकीच्या ठिकाणी असतील तर तुमच्या आरोग्यावर किंवा वैवाहित जीवनात समस्या येण्याची शक्यता असते. जाणून घेऊया हे नियम काय आहेत.

बेडरूममध्ये या गोष्टी ठेऊ नयेत

गोकर्णाचं झाड

वास्तू शास्त्रानुसार, तुमच्या घरातील बेडरूममध्ये कधीही काट्यांचं झाड किंवा रोप नसावं. यामध्ये बेडरूममधील कोणत्याही कोपऱ्यात गोकर्णाचं झाड नाही याची खात्री करून घ्या. यामुळे तुमच्या जीवनात वैवाहिक समस्या येऊ शकतात.

प्राण्यांचे फोटो

वास्तुशास्त्रानुसार आक्रमक प्राण्यांचे फोटो किंवा दुःखी चेहऱ्याचे फोटो बेडरूममध्ये अजिबात ठेवू नये. असं केल्याने तुमच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो. त्यामुळे जर असे फोटो तुमच्या बेडरूममध्ये असतील तर ते लगेच काढून टाका

धबधब्याचा फोटो

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या बेडरूममध्ये धबधब्याचा फोटो कधीही लावू नका. या फोटोंमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, असं म्हटलं जातं. वास्तूनुसार यामुळे पती-पत्नीमधील विश्वास कमी होऊ शकतो.

बेडरूमची कोणती दिशा नात्यासाठी फायदेशीर?

वास्तुशास्त्रानुसार, सुखी वैवाहिक जीवनासाठी बेडरूमच्या दिशेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अशावेळी तुमच्या घराच्या बेडरूम उत्तर किंवा वायव्य दिशेला बनवावी. यामुळे पती-पत्नीचं नातं मजबूत होतं, असं मानलं जातं.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती वास्तू शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांना मोठं यश; शाळेचे अध्यक्ष आणि सचिवांना केली अटक, दीड महिने कुठे होते?

Alcohol Viral Video: दारूमुळे होतो कॅन्सर? काय आहे सत्य? जाणून घ्या...

Harshvardhan Patil News : शरद पवारांकडून भाजपला सर्वात मोठा धक्का; पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता हाती तुतारी घेणार, वाचा

Maharashtra News Live Updates: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार?

Nashik News : दोन मैत्रिणींचा जाच असह्य झाला; २३ वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT