Warning signs before a heart attack saam tv
लाईफस्टाईल

Heart attack: हार्ट अटॅक येण्याच्या काही दिवस अगोदर शरीरात दिसतात 'ही' लक्षणं; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

How to prevent a heart attack: हृदयविकाराची पूर्व लक्षणे शरीरात काही दिवस किंवा आठवडे आधीच दिसू लागतात. बहुतेक लोक त्यांना सामान्य थकवा, अपचन किंवा स्नायूंचा ताण समजून त्याकडे दुर्लक्ष करतात.

Surabhi Jayashree Jagdish

  • हृदयविकाराची लक्षणे लवकर ओळखा

  • अचानक घाम, मळमळ हृदय धोक्याचे सूचक

  • श्वास घेण्यात अडचण हृदयसमस्येचे लक्षण

आपल्या शरीरात हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांची माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. कोणत्याही आजारावर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याचा प्रतिबंध करणं. काही लोकांना आजारांशी सामना करणं कठीण जातं, परंतु काही आजार आपण सुरुवातीला ओळखू शकतो. त्यासाठी आपण थोडं सावध राहणं गरजेचं आहे.

हृदय प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. हृदयाच्या बाबतीत हार्ट बीट आणि हार्ट रेट खूप महत्त्वाचा आहे. परंतु, तुम्हाला माहिती आहे का की, हृदयविकाराचा झटका होण्यापूर्वी तुमचं शरीर सतत तुम्हाला संकेत देतं? हे संकेत समजून न घेणं किंवा दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकते. अहवालानुसार, हृदयविकार होण्यापूर्वी आपल्या शरीरात अनेक प्रकारचे संकेत दिसू लागतात. आपल्याला नेहमीच या संकेतांकडे लक्ष द्यावं लागतं. कारण दुर्लक्ष केल्यास इतर आजारही होऊ शकतात.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, काही लोकांना छातीत ताण जाणवतो, ज्याला एंजायना असंही म्हणतात. या वेळी श्वासोच्छ्वासावर ताण येतो आणि अस्वस्थपणा जाणवते. ज्यावेळी हृदयाला पुरेशी ऑक्सिजनयुक्त रक्त मिळत नाही, तेव्हा छातीत वेदना जाणवतात. लोक सहसा या ताणाकडे दुर्लक्ष करतात. परंतु जर हा ताण सतत राहिला, तर हृदयविकाराचा धोका वाढतो.

अचानक घाम येणं

कधीकधी अचानक घाम येणं किंवा मळमळ जाणवणं हे देखील हृदयाशी संबंधित लक्षण असू शकतं. योग्य आहारानंतरही अशक्तपणा जाणवणं, थकवा जाणवणं, हे हृदयाच्या समस्येचे संकेत आहेत.

श्वास घेण्यात अडचण

श्वास घेण्यात अडचण हृदयाव्यतिरिक्त फुफ्फुसांवरही परिणाम करते. जर फुफ्फुसांना रक्तपुरवठा नीट मिळत नसेल, तर श्वास घेण्यात अडचण येते आणि मेंदूत ऑक्सिजन पोहोचणे कमी होते. त्यामुळे श्वासोच्छ्वासाची समस्या निर्माण होऊ शकते.

थकवा आणि झोप न येणं

थकवा आणि झोप न येणं हृदयविकाराचं आणखी एक लक्षण आहे. जर तुम्ही चांगला आहार घेतला आणि व्यायाम केला तरीही थकवा जाणवत असेल, तर हृदयातील रक्तप्रवाह कमी झाल्याचे संकेत आहेत. आर्टरीजमध्ये प्लॅक साचल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. झोपेची कमतरता देखील हृदयासाठी धोकेदायक असते.

हृदयविकाराची पहिली लक्षणे कोणती?

छातीत ताण, घाम, श्वासाची अडचण.

एंजायना म्हणजे काय?

हृदयाला ऑक्सिजन कमी झाल्याचे लक्षण.

अचानक घाम येणे धोकादायक का?

हे हृदयविकाराचे सूचक असू शकते.

श्वास घेण्यात अडचण का होते?

फुफ्फुसांना पुरेसे रक्त मिळत नाही.

थकवा हृदयाशी कसा संबंधित आहे?

हृदयाचा रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे थकवा येतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात ऊस दरासाठी असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून आंदोलकांना धक्काबुक्की

Methi Thepla Recipe : नाश्त्यासाठी बनवा गुजरात स्पेशल मेथी थेपला, झटपट तयार होते रेसिपी

मुंबईत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आता राजकीय दबावाचा नवा वाद, नेमकं काय घडलं?

Success Story: लहानपणी आईवडिलांचे छत्र हरपलं, आजीने मोठं केलं, सलग ५ वेळा अपयश, ६व्या प्रयत्नात IPS; अंशिका जैन यांचा प्रवास

Oldest Forts In India: भारतातील सगळ्यात जूने किल्ले कोणते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT