Liver cirrhosis last stage saam tv
लाईफस्टाईल

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

Signs of liver damage: जेव्हा यकृताला दीर्घकाळ सूज किंवा इजा होते आणि त्यामुळे फायब्रस टिश्यू तयार होतात, तेव्हा त्याला 'यकृत सिरोसिस' म्हणतात. सिरोसिसच्या शेवटच्या टप्प्यात यकृत गंभीरपणे खराब होते आणि त्याची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात कमी होते

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या शरीरातील लिव्हर हा एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. लिव्हरच्या माध्यमातून पचनक्रिया, विषारी घटकांची शुद्धी, आणि ऊर्जा निर्मिती ही कार्य केली जातात. मात्र सध्या अनेकांना फॅटी लिव्हरसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही स्थिती सुरुवातीला फारशी गंभीर वाटत नसली, तरी याकडे वेळेवर लक्ष दिलं नाही तर लिव्हर सिरोसिससारख्या गंभीर आजाराचा धोका वाढतो.

फॅटी लिव्हर म्हणजे काय?

फॅटी लिव्हर म्हणजे लिव्हरमध्ये चरबी जमा होणं. ही स्थिती सुरुवातीला कोणत्याही लक्षणांशिवाय दिसते. साध्या आहार आणि जीवनशैलीतील सुधारणा करून ती सहज बरी होऊ शकते. पण याकडे दुर्लक्ष केल्यास पुढे लिव्हर सिरोसिससारख्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकते. या समस्येमध्ये लिव्हरवरच नुकसान झालेलं असतं.

लिव्हर सिरोसिस म्हणजे काय?

लिव्हर सिरोसिस ही एक दीर्घकालीन समस्या आहे. यामध्ये लिव्हरच्या हेल्दी पेशींवर सूज येते आणि हळूहळू त्या पेशी डॅमेज होतात. या समस्येमध्ये जसं नुकसान वाढत जातं, तसंतसं लिव्हर आपलं कार्य करणं थांबवतो. या अवस्थेला डी-कंपेन्सेटेड सिरोसिस असं म्हणतात. यावेळी लक्षणं तीव्रपणे दिसू लागतात.

लिव्हर सिरोसिसच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कोणती लक्षणं दिसून येतात?

  • त्वचा आणि डोळे पिवळसर होणं

  • लघवीचा रंग गडद होणं

  • फिकट रंगाचा मल

  • डोळ्यांच्या पापण्या किंवा त्वचेवर पिवळसर वसा जमा होणं

  • हात, पाय, पोट किंवा चेहऱ्यावर सूज येणं

  • पोट फुगल्यासारखं वाटणं

लिव्हर सिरोसिसवर कशा पद्धतीने उपचार करू शकतो?

लिव्हर सिरोसिस एकदा झाल्यानंतर ती रिव्हर्स होत नाही. त्यामुळे डॉक्टर यावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधं, विशिष्ट आहार आणि नियमित तपासण्यांचा सल्ला देतात. मुख्य म्हणजे लक्षणांवर नियंत्रण ठेवणं हे प्राथमिक उद्दिष्ट असतं. फायबरयुक्त आणि कमी चरबीयुक्त आहार, मीठाचं प्रमाण कमी करणं, दारू, सिगारेटपासून पूर्णतः दूर राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक प्रकरणांमध्ये अंतिम उपाय म्हणून लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागतं.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT