Immunity booster, Herbs which can do wonders to your immunity during monsoon ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

पावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी या औषधी वनस्पती उपयोगी ठरतील

पावसाळ्यात या औषधी वनस्पतींनी रोगप्रतिकारशक्ती वाढवा.

कोमल दामुद्रे

मुंबई : पावसाळा हा प्रत्येकाला आवडणारा ऋतू आहे. सर्व वयोगटातील लोक याचा आनंद घेत असतात. या दिवसात अनेक तरळलेले पदार्थ, चहा पिण्याची आपल्या जीभेला चटक लागते.

हे देखील पहा -

बदलत्या हवामानामुळे पावसाळ्यात अनेक साथीचे आजारांना आपण बळी पडू शकतो. पावसाळ्यात सर्दी, खोकला, फ्लू, टायफॉइड, मलेरिया, डायरिया आणि डेंग्यू हे या हवामानासोबतचे काही सामान्य आजारही आहेत. अशावेळी आपण या काही औषधी वनस्पतीचा वापर करायला हवा.

१. तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, अँटी-एजिंग आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. तुळशी ही जितकी धार्मिक कार्यात उपयोगी असते तितकीच ती आयुर्वेदातही महत्त्वाची आहे. पावसाळ्यात आपल्याला सर्दी-खोकला झाला असेल तर, तुळशीचा चहा रोगप्रतिकारशक्ती वाढवू शकतो आणि संक्रमणाशी लढू शकतो.

२. गुळवेल या औषधी वनस्पतींद्वारे हंगामी फ्लू सहज बरा होऊ शकतो. याच्या सेवनाने आपली प्रतिकारशक्ती कमी वेळात वाढते. गुळवेलामुळे पावसाळ्यात (Monsoon) त्वचेला चमकदार पोत येऊन डिटॉक्सिफिकेशन करता येते. हे हायपोग्लाइसेमिक एजंट टाइप २ मधुमेहाशी लढा देण्यासाठी फायदेशीर आहे. त्यातील अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि सिस्टममधून विषारी पदार्थ काढून टाकतात.

३. भारतीय स्वयंपाकघरात हमखार आढळणारा मसाला हळदी (Turmeric) त्वचेची काळजी घेणार्‍या अनेक उत्पादनांमध्ये हा मुख्य घटक असतो. गरम दुधासोबत घेतल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच अनेक जखमा बरे करते आणि शरीराच्या तीव्र वेदनांमध्ये आराम देते. पावसाळ्यात हळद कोरड्या त्वचेला आर्द्रता देते. पावसाळ्यात पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते. तसेच शरीरातील चयापचय दर वाढवतात त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: 'हे' आहेत जगातील तीन सर्वात विचित्र आणि थक्क करणारी ठिकाणं

Chanakya Niti: नवरा- बायकोने या ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, सुखी होईल जीवन

Maharashtra Live News Update : राज ठाकरे मिरारोडच्या दौऱ्यावर जाणार

Kalyan News : कल्याणमध्ये डेंग्यूचा पहिला बळी, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; KDMC मध्ये २ महिन्यांत ३५ रुग्णांची नोंद

Washim Crime News : चाकूचा धाक दाखवून लुटमारी; ट्रक लुटणारी टोळी ताब्यात, ट्रकसह पशुखाद्य जप्त

SCROLL FOR NEXT