Negative Thoughts Saam Tv
लाईफस्टाईल

Negative Thoughts: सतत नकारात्मक विचार करताय? हे गंभीर आजार जडू शकतात

Health Side Effect Of Negative Thought: निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी माणसाचे विचार हे सकारात्मक असले पाहिजे. मात्र रोजच्या व्यस्त आणि कामाच्या ताणतणावामुळे मनात नकारात्मक विचार येतात.

Manasvi Choudhary

Health Side Effect Of Negative Thought: निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी माणसाचे विचार हे सकारात्मक असले पाहिजे. मात्र रोजच्या व्यस्त आणि कामाच्या ताणतणावामुळे मनात नकारात्मक विचार (Negative Thought) येतात.अनेकदा घरातील मोठ्या मंडळीकडून नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.

मानवी मनावर विचार, भावना आणि वागणूक यांचा प्रभाव पडत असतो.आपण मनामध्ये जो विचार करत असतो याचा परिणाम केवळ आपल्या मानसिक मनावर नाही तर आरोग्यावर (Health) देखील होत असतो. व्यक्तीच्या मनातील नकारात्मक विचार हे आत्मविश्वासच कमी करत नाही तर आरोग्यावर देखील परिणाम करतात. नैराश्यामुळे अनेक प्रकारच्या गंभीर समस्या देखील उद्भवतात.

जर्नल ऑफ मेडिसिन अँड लाईफने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, सतत नकारात्मक विचार केल्याने आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे थॉयराईड, आणि उच्च रक्तदाब यासारंख्या समस्यांना बळी पडू शकता.

1) रोगप्रतिकारशक्ती

अतिविचार केल्याने रोगप्रतिकार शक्ती देखील कमकुवत होऊ शकते. रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास अनेक आजारांना बळी पडले जाऊ शकता.

2) हृदयाचे ठोके

सततच्या तणावामुळे अनेकदा हाय बीपीचा त्रास होतोय ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. यामुळे तुम्हीही आरोग्याच्या काळजीसाठी जास्त ताणतणाव घेऊ नका आणि निरोगी राहा.

3) पचन समस्या

नकारात्मक विचार करत राहिल्याने तणावाची स्थिती निर्माण होते. जास्त ताण घेतल्याने पचनक्रियेवर देखील त्याचा परिणाम होतो. शरीरातील आतड्याचे आरोग्य हे भावनिक आरोग्याशी संबंधित असल्याने नकारात्मक विचार केल्याने आतड्यामधील बॅक्टेरियामुळे संतुलन बिघडते. ज्यामुळे पोटात अल्सर होऊ शकते.

4) उच्च रक्तदाब

जर तुम्ही सतत नकारात्मक विचार करत असाल तर यामुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो. नकारात्मक विचार केल्याने तणाव येतो ज्यामुळे रक्तवाहिन्या संकुचिक होतात आणि उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nora Fatehi Accident: मोठी बातमी! बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात

Navi Mumbai Politics: शरद पवार गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Election: भाजपची इन्कामिंग एक्सप्रेस सुसाट,पुण्याचे माजी महापौर हाती घेणार कमळ?

Sunday Horoscope : जिवनाचं खरं सार्थक होणार; ५ राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार

अकोल्याच्या बाळापूर नगरपरिषदेवर कुणाचं वर्चस्व असणार? 'वंचित' सत्ताधाऱ्यांना धक्का देणार?

SCROLL FOR NEXT