Fatty liver symptoms in women saam tv
लाईफस्टाईल

Fatty liver symptoms in women: महिलांना फॅटी लिव्हरचा त्रास झाल्यास शरीरात होतात 'हे' बदल; वेळीच जाणून द्या लक्षणं

Early signs of fatty liver: आजकाल चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेक आजार वाढत आहेत. यापैकीच एक गंभीर आजार म्हणजे फॅटी लिव्हर. यकृत शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करतो.

Surabhi Jayashree Jagdish

  • महिलांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या वाढत आहे.

  • चुकीचा आहार आणि लठ्ठपणा लिव्हरवर चरबी जमा करतात.

  • पीसीओएस आणि इन्सुलिन रेझिस्टन्स धोका वाढवतात.

आजकाल महिलांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या झपाट्याने वाढताना दिसते. ही समस्या सुरुवातीला कोणतीही लक्षणं न दिसता वाढत जाते आणि लक्षात न येता मोठं नुकसान करून ठेवते. महिलांच्या शरीरात हार्मोनल बदलांपासून ते जीवनशैलीपर्यंत अनेक गोष्टींमुळे फॅटी लिव्हर होऊ शकतो. रजोनिवृत्ती नंतरचे बदल, पीसीओएस, थायरॉईडची समस्या, जास्त प्रमाणात प्रोसेस्ड फूड खाणं, व्यायामाचा अभाव किंवा चुकीच्या डाएटमुळे लिव्हरवर चरबी जमा होण्याचा धोका वाढतो.

इतर आजारांप्रमाणे फॅटी लिव्हर ही समस्या देखील काही संकेत देत असते. हे संकेत ओळखणं गरजेचं आहे. महिलांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या झाल्यास कोणती लक्षणं दिसतात ते पाहूयात.

चुकीचा आहार आणि लठ्ठपणा

साखर, जास्त तेलकट पदार्थ, फास्ट फूड आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स महिलांच्या लिव्हरमध्ये चरबी साठवतात. अशा आहारासोबत जर व्यायामाचं प्रमाण कमी असेल, तर लठ्ठपणा वाढतो.

इन्सुलिन रेझिस्टन्स आणि पीसीओएस

पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये इन्सुलिन नीट काम करत नाही, त्यामुळे रक्तातील साखर नीट प्रोसेस होत नाही. परिणामी ही साखर चरबीत रूपांतरित होऊन लिव्हरमध्ये साठते. पीसीओएस नसतानाही मधुमेह किंवा प्रीडायबेटिस असलेल्या महिलांना याचा धोका जास्त असतो.

मद्यपान

फॅटी लिव्हर बहुतेक वेळा अल्कोहोलशिवाय होतो. पण तरीही मद्यपान मोठं कारण आहे. महिलांचं शरीर पुरुषांपेक्षा वेगळ्या प्रकारे अल्कोहोल पचवतं त्यामुळे कमी प्रमाणात घेतलं तरी त्याचा लिव्हरवर जास्त परिणाम होतो. वारंवार किंवा जास्त प्रमाणात मद्यपान केल्यास लिव्हरमध्ये चरबी साठते.

हार्मोनल बदल आणि रजोनिवृत्ती

इस्ट्रोजेन हा हार्मोन शरीरातील चरबीचं वितरण आणि मेटाबॉलिझम नीट ठेवतो. पण रजोनिवृत्तीनंतर इस्ट्रोजेनचं प्रमाण घटतं आणि पोटाभोवती व लिव्हरमध्ये चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये फॅटी लिव्हर होण्याची शक्यता अधिक असते.

व्यायामाचा अभाव

नियमित शारीरिक हालचाल न केल्याने मेटाबॉलिझम मंदावतो आणि शरीर चरबी जाळू शकत नाही. विशेषतः ऑफिसमध्ये किंवा घरी दिवसभर बसून राहणाऱ्या महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसते.

झपाट्याने वजन कमी होणं

लवकर वजन कमी करण्यासाठी क्रॅश डाएट, उपाशीपोटी डिटॉक्स प्लॅन किंवा चुकीचं फास्टिंग केल्याने लिव्हरवर भार येतो. अशावेळी शरीरात जास्त प्रमाणात फ्री फॅटी ऍसिड्स तयार होतात, ज्यामुळे लिव्हरला इजा पोहोचते. आवश्यक पोषक तत्वं न मिळाल्यानेही लिव्हर कमकुवत होतं.

फॅटी लिव्हर होण्यासाठी महिलांमधील मुख्य कारणे कोणती?

चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, हार्मोनल बदल आणि पीसीओएस ही मुख्य कारणे आहेत.

पीसीओएस असलेल्या महिलांना फॅटी लिव्हरचा धोका का जास्त असतो?

इन्सुलिन रेझिस्टन्समुळे साखर चरबीत रूपांतरित होऊन लिव्हरमध्ये साठते.

रजोनिवृत्तीनंतर फॅटी लिव्हरचा धोका का वाढतो?

इस्ट्रोजेनच्या प्रमाणात घट झाल्यामुळे चरबी लिव्हरमध्ये जमा होते.

मद्यपानाचा फॅटी लिव्हरवर काय परिणाम होतो?

महिलांच्या शरीराला अल्कोहोल जास्त प्रभावित करते, ज्यामुळे लिव्हरमध्ये चरबी साठते.

क्रॅश डाएट किंवा उपवासाचा लिव्हरवर काय परिणाम होतो?

अशा डाएटमुळे लिव्हरवर भार पडून त्याला इजा होते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GST Tax Reforms: मोठी बातमी! १२, २८ टक्क्यांचा स्लॅब रद्द, जीएसटी प्रणालीतील बदलाच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल

Maharashtra Live News Update : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने मुठा नदीचं रौद्र रूप

Pune : ८२ कोटींची चोरी, कंपनी काढून डेटा विकला; हिंजवाडीतलं कांड कसं समोर आलं?

Vastu Tips: या वस्तू कोणाकडूनही फुकट घेऊ नका, अन्यथा वाढेल संकट

Kalyan Congress : कल्याण वासियांसाठी काँग्रेसची अनोखी स्पर्धा; बिनखड्ड्याचा रस्ता शोधणाऱ्यास ५ हजाराचे बक्षिस

SCROLL FOR NEXT