Health warning signs SAAM TV
लाईफस्टाईल

Health warning signs: किडनी आणि लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Symptoms of serious disease: कोणत्याही समस्येची लक्षणं तुमचं शरीर तुम्हाला देत असतं. अशावेळी किडनी किंवा लिव्हरची समस्या असेल तर शरीर त्याचे संकेत तुम्हाला देतं. ही लक्षणं कोणती आहेत ती पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

जर तुम्हाला एखादा गंभीर आजार होणार असेल, तर तुमचं शरीर त्याचे संकेत तुम्हाला देत असतं. त्यामुळे तज्ज्ञही नेहमी आपल्याला सांगतात की, शरीरात कोणतीही लक्षणं दिसली तरी त्याकडे दुर्लक्ष करू नये. कदाचित ते एका मोठ्या आजाराचे संकेत असू शकतं.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्यावेळी तुम्हाला अधिक थकवा, डोकेदुखी किंवा त्वचेमध्ये कोणताही बदल जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. मुळात, ही लक्षणं जर वारंवार दिसत असतील, तर ते कोणत्याही कारणाशिवाय होत नाही. याचा अर्थ, शरीरात कोणतातरी बिघाड झाल्याचे संकेत असतात. मात्र, लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना डॉ. भानू मिश्रा यांनी सांगितलं की, बऱ्याचदा शरीरात कोणताही मोठा बदल किंवा आजार असेल, तर ठळक लक्षणं दिसून येत नाहीत. लक्षणं जरी दिसत असली, तरी लोकं त्याकडे सामान्य समजून दुर्लक्ष करतात. ज्यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हा लोकं त्याकडे गांभीर्याने पाहतात.

सततचा थकवा

जर तुम्हाला सततचा थकवा जाणवत असेल, तर त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. हे लक्षण गंभीर असू शकतं. जर हा थकवा आराम करूनही जात नसेल, तर तुम्ही डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे. लिव्हर किंवा किडनीवर जर अतिरिक्त ताण येत असेल, तर ही लक्षणं तुम्हाला दिसू शकतात.

वारंवार होणारी डोकेदुखी

लक्ष केंद्रित करण्यात अडचण येत असेल किंवा सतत डोकेदुखी होत असेल, तर आपण कामाचा वाढलेला ताण किंवा वाढलेला स्क्रीन टाईम समजून दुर्लक्ष करतो. मात्र, डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, हे डिहायड्रेशन, वाढलेलं ब्लड प्रेशर किंवा शरीरात साचलेले टॉक्सिन पदार्थ यांची लक्षणं असू शकतात.

शरीरातील या बदलांकडेही लक्ष द्या

तुमच्या शरीरात अशी काही लक्षणं दिसून येतात, जी किडनीच्या समस्यांकडे इशारा करतात. यामध्ये लघवीचा रंग अचानक बदलणं, पायावर सूज येणं किंवा डोळ्यांच्या आसपासचा भाग सूजणं या लक्षणांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, लिव्हरच्या समस्या असतील, तर त्वचा, केस आणि नखांमध्येही तुम्हाला बदल दिसू शकतात.

अचानक तुमची त्वचा फिकी पडत असेल किंवा खाज येत असेल, तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. केस गळणं, नखं तुटणं याचा अर्थ तुमच्या शरीरात पोषण तत्त्वांची कमतरता असू शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडमधून दरे गावाकडे रवाना

Good News: ST प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, घरबसल्या NCMC कार्ड रिचार्ज करता येणार; कसं ते वाचा...

Shiv Sena Symbol Hearing: दोन्ही शिवसेनेने बाळासाहेबांच्या नव्हे, तर स्वतःच्या बळावर लढावे; सुप्रीम कोर्ट

Tomato Storage Tips: टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवायचा की बाहेर? ताजा आणि चांगला ठेवण्यासाठी जाणून घ्या ७ सोपे उपाय

Actress Hospitalized: दिग्गज अभिनेत्रीची तब्येत बिघडली; हॉस्पिटल मधील फोटो व्हायरल; नाकातील ट्यूब पाहून चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT