Blocked Arteries saam tv
लाईफस्टाईल

Blocked Arteries: हृदयाच्या नसा बंद पडण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; वेळीच तपासणी करून घ्या

Blocked Arteries: रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या पातळ होऊ शकतात किंवा ब्लॉक होऊ शकतात. हृदयाच्या नसा बंद किंवा ब्लॉक होण्यापूर्वी शरीरात कोणती लक्षणं दिसतात ती जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

हार्ट अटॅक येण्यापूर्वी तुमच्या हृदयाच्यानसा ब्लॉक होतात. जेव्हा हृदयाच्या सभोवतालच्या नळ्या पातळ होतात तेव्हा कोरोनरी आर्टरी ब्लॉक होतात. याला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतात. या समस्येमुळे भविष्यात गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यामुळे हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या पातळ होऊ शकतात किंवा ब्लॉक होऊ शकतात. ज्यामुळे रक्तपुरवठा कमी होतो आणि हृदयविकाराचा झटका येतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, हार्ट अटॅक येण्यापूर्वी कोरोनरी आर्टरी ब्लॉकेजची लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं वेळेत समजून घेणं आवश्यक आहे. यामुळे आपण वेळीच उपचार सुरू करू शकतो. मात्र हृदयाच्या नसा बंद किंवा ब्लॉक होण्यापूर्वी शरीरात कोणती लक्षणं दिसतात ती जाणून घेऊया.

कोरोनरी आर्टरी ब्लॉक होणं म्हणजे नेमकं काय?

एथेरोस्क्लेरोसिसमुळे कोरोनरी धमन्या पातळ होतात किंवा ब्लॉक होतात. याचवेळी कोरोनरी धमनीची समस्या निर्माण होते. एथेरोस्क्लेरोसिस ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये कोलेस्ट्रॉल, फॅटी डिपॉझिट किंवा इतर पदार्थ कोरोनरी धमन्यांमध्ये किंवा त्याच्या आसपास तयार होतात. परिणामी ऑक्सिजन समृद्ध रक्त हे हृदयाच्या स्नायूपर्यंत पोहोचणं कठीण होतं आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

कोरोनरी ब्लॉकेजची सुरुवातीची लक्षणं कोणती?

कोरोनरी धमनीमधील अडथळ्याची सुरुवातीची लक्षणं ओळखणं कठीण होणार आहे. त्याची लक्षणं भिन्न दिसू शकतात. जाणून घेऊया याची लक्षणं काय आहेत.

छातीत दुखणं किंवा अस्वस्थता

कोरोनरी आर्टरी ब्लॉकेजच्या सर्वात सामान्य लक्षणांपैकी एक म्हणजे छातीत दुखणं किंवा अस्वस्थता जाणवणं. ही वेदना छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला जाणवू शकते. जर अशी लक्षणं कोणाला दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांची मदत घ्यावी.

श्वासोच्छवासाचा त्रास

शांत बसलं असतानाही किंवा अंथरूणात असताना जेव्हा श्वास घेण्यात अडचण येत असेल तर हे हृदयाच्या नसा ब्लॉक होण्यामागचं कारण आहे. ही लक्षणं हृदयाला रक्त प्रवाहाची कमतरता दर्शवू शकतात.

थकवा जाणवणं

जर तुम्हाला अचानक किंवा साधी कामं केल्यानंतर फार थकवा जाणवत असेल तर हे धमन्यांमध्ये अडथळा येण्याचं लक्षणं असू शकतं. या थकव्यामुळे शारीरिक क्षमता कमी होऊ शकते आणि अशक्तपणा जाणवू शकतो.

अपचन

अनेकदा आपण अपचनाकडे दुर्लक्ष करतो. मात्र हा त्रास हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होण्याचं एक कारण असू शकतं. यामध्ये काही व्यक्तींना काही व्यक्तींना पोटाच्या वरच्या भागात मळमळ, अपचन किंवा अस्वस्थता जाणवू शकतो.

चक्कर येणं

चक्कर येणं हे देखील हृदयाला रक्त प्रवाह कमी झाल्याचं सूचित करतं. हे अचानक होण्याचा धोका असू शकतो. जर तुम्हाला वारंवार हा त्रास जाणवत असेल तर वेळी डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

कोरोनरी आर्टरीज ब्लॉक होण्यामागे कारण?

  • वय

  • कौटुंबिक इतिहास

  • धूम्रपान

  • उच्च रक्तदाब

  • हाय कोलेस्ट्रॉल

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT