Liver damage Early symptoms SAAM TV
लाईफस्टाईल

Liver disease warning: लिव्हर खराब झाल्यावर त्वचेवर दिसतात 'हे' बदल; गंभीर गुंतागुंत होण्यापूर्वी लक्ष द्या

Liver failure symptoms: यकृत म्हणजेच लिव्हर (Liver) हा आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे, जो विषारी पदार्थ बाहेर टाकणे, पचनक्रिया सुधारणे आणि प्रथिने तयार करणे अशी अनेक महत्त्वाची कार्ये करतो.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक अवयव म्हणजे यकृत. शरीरातील चयापचय प्रक्रियेत लिव्हरची भूमिका अत्यंत मोठी असते. त्याचप्रमाणे शरीरातील विषारी पदार्थांचं शुद्धीकरण करणं, पोषक तत्वं साठवून ठेवणं, हार्मोन्सचे संतुलन करणं या सगळ्या जबाबदाऱ्या लिव्हरकडून पार पाडल्या जातात.

ज्यावेळी लिव्हर नीट काम करत नाही तेव्हा शरीरात गंभीर आजार निर्माण होऊ शकतात. यामध्ये सिरोसिस, हिपॅटायटीस आणि यकृताचा कॅन्सर यांचा समावेश आहे. मात्र या आजारांपैकी एक महत्त्वाचा आणि कमी ओळखला जाणारा भाग म्हणजे त्वचेवर दिसणारे बदल. लिव्हरचे आजार अनेकदा त्वचेवर दिसणाऱ्या लक्षणांमधून ओळखता येतात, आणि ही लक्षणं वेळेवर ओळखल्यास आजाराचं निदान आणि उपचार लवकर होऊ शकतात.

हार्वर्ड आणि स्टॅनफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलेले प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हिपॅटोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी एका इंस्टाग्राम पोस्टमधून लिव्हरच्या आजाराशी संबंधित त्वचेवरील चार महत्त्वाच्या लक्षणांची माहिती दिली आहे. २०२३ मधील एका संशोधनानुसार, दरवर्षी सुमारे २० लाख लोक लिव्हरशी संबंधित आजारांमुळे मृत्युमुखी पडतात, म्हणजेच जगातील एकूण मृत्यूपैकी जवळपास ४ टक्के मृत्यू लिव्हर आजारांमुळे होतात. त्यामुळे या लक्षणांची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे.

कावीळ

लिव्हरच्या समस्येचे सर्वाधिक ओळखलं जाणारं लक्षण म्हणजे पिवळे ताप, ज्यामध्ये त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळसर दिसू लागतो. हे तेव्हा घडतं ज्यावेळी लिव्हर शरीरातील बिलिरुबिन योग्य प्रकारे प्रक्रिया करू शकत नाही. लाल रक्तपेशींच्या विघटनानंतर तयार होणारे हे द्रव्य शरीरात साचल्यास त्वचा आणि डोळे पिवळसर दिसू लागतात.

त्वचेवर लाल शिरा दिसणे (स्पायडर अँजिओमा)

लिव्हरच्या बिघाडाचं आणखी एक लक्षण म्हणजे त्वचेवर लहान जाळ्यासारख्या लालसर रक्तवाहिन्या दिसू लागणं. या समस्येला स्पायडर अँजिओमा म्हणतात. या प्रामुख्याने चेहरा, मान आणि छातीवर दिसतात. लिव्हर सामान्यतः शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनचं संतुलन राखतं, पण जेव्हा ते नीट कार्य करत नाही, तेव्हा या हार्मोन्सचे प्रमाण वाढते आणि अशा रक्तवाहिन्यांचे विकार दिसू लागतात.

तळहात लाल होणं

लिव्हरच्या कार्यात बिघाड झाल्यास तळहातांवर सतत लालसरपणा, उष्णता किंवा सूज जाणवू लागते. या स्थितीला पाल्मर एरिथेमा असं म्हणतात. हे लक्षण रक्तप्रवाह वाढणं आणि इस्ट्रोजेनचं प्रमाण जास्त होणं यामुळे दिसून येतं. अनेक वेळा हे लक्षण त्वचेची अ‍ॅलर्जी, हातांचा थकवा असं मानलं जातं. पण प्रत्यक्षात हे लिव्हरच्या आजाराचं लक्षण असू शकतं.

सतत खाज येणं

कधी कधी कोणत्याही कारणाशिवाय, विशेषतः रात्रीच्या वेळी अत्यंत खाज येणं हे लिव्हरच्या आजाराचं आणखी एक महत्त्वाचं संकेत असू शकतं. लिव्हर नीट काम करत नसल्यास बाईल सॉल्ट्स त्वचेत साचतात आणि त्यामुळे तीव्र खाज निर्माण होते. या खाजेमध्ये नेहमीप्रमाणे पुरळ किंवा रॅश दिसत नाही, पण ती असह्य असू शकते आणि जीवनमानावर परिणाम करू शकते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

SCROLL FOR NEXT