Heart attack warning signs saam tv
लाईफस्टाईल

Heart attack warning signs: महिलांना हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात ही 6 महत्त्वाची लक्षणं; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

Heart attack symptoms in women: हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात दिसणारी लक्षणे अनेकदा वेगळी आणि अधिक सूक्ष्म असतात. त्यामुळे, ही लक्षणे अनेकदा सामान्य थकवा, अपचन किंवा इतर किरकोळ समस्या समजून दुर्लक्षित केली जातात

Surabhi Jayashree Jagdish

आपल्याकडे हार्ट अटॅक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच डोळ्यासमोर मध्यमवयीन किंवा वयोवृद्ध पुरुषाचं चित्र उभं राहतं. मात्र महिलांनाही हार्ट अटॅक येतो आणि महिलांनाही हृदयविकाराचा धोका तितकाच असतो. अशावेळी महिलांमध्ये हार्ट अटॅकची काय लक्षणं दिसतात ती आज या आर्टिकलच्या माध्यमातून जाणून घेऊया

महिलांमध्ये हार्ट अटॅक होतो तेव्हा त्याची लक्षणं पुरुषांपेक्षा थोडी वेगळी असतात. त्यामुळे त्या वेळेवर डॉक्टरांकडे जात नाहीत. यावेळी महिलांना स्वतःलाच समजत नाही की शरीर काय इशारा देतंय. आज आपण महिलांमधील हार्ट अटॅकची ६ लक्षणं जाणून घेऊया.

छातीमध्ये वेदना होणं

छातीत वेदना होणं हे पुरुष आणि स्त्रिया या दोघांमध्येही दिसून येणारं लक्षण आहे. मात्र याची मात्रा दोघांमध्ये काही प्रमाणात वेगळी दिसून येते. पुरुषांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी छातीत तीव्र वेदना जाणवू शकतात. तर महिलांमध्ये छातीत जडपणा वाटणं, दाब आणि मध्यभागी वेदना जाणवू शकतात.

शरीरातील इतर अवयवांमध्ये वेदना

हार्ट अटॅक येण्यापूर्वी केवळ छातीत वेदना होत नाहीत तर तुमच्या शरीरातील इतर भागांमध्येही त्या वेदना जाणवू लागतात. यावेळी महिलांना हात, पाठ, मान, जबडा तसंच पोटात वेदना होण्याची समस्या जाणवू शकते. त्यामुळे महिलांना जर अशी लक्षणं दिसली तर त्यांनी तातडीने डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

श्वास घेण्यास त्रास होणं

महिलांना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते हार्ट अटॅकचं महत्त्वाचं लक्षण मानलं जातं. यावेळी महिलांमध्ये हे लक्षण छातीत वेदना न होता देखील जाणवू शकतं. कोणतंही मेहनतीचं काम न करता जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे.

मळमळ

हार्ट अटॅक फक्त छातीत वेदना देतो असं नाही. महिलांमध्ये हार्ट अटॅकचं लक्षण म्हणून उल्टी होणं, पोट खूप भरल्यासारखं वाटणं, किंवा काहीही खाल्लं नसलं तरी मळमळणं असं दिसू शकतं. अनेक महिला याला फूड पॉइझनिंग, फ्लू, किंवा स्ट्रेसशी यांच्याशी जोडतात. मात्र हे हार्ट अटॅकचं लक्षणं असतं.

थंड घाम

अचानक अंगावर थंड घाम फुटणं, अंग थोडं थरथरणं, चक्कर येणं ही हार्ट अटॅकची लक्षणं असू शकतात. बऱ्याच वेळा लोक याला पॅनिक अटॅक, स्ट्रेस समजतात. पण जर या लक्षणांसोबत छातीत जडपणा, दम लागणं वगैरे असलं, तर त्या डॉक्टरांची मदत घेणं फायद्याचं ठरेल

पॅनिक अटॅकसारखं वाटणं

कधी कधी हार्ट अटॅक यायच्या आधीच काही महिलांना अचानक भीती, बेचैनी, किंवा काहीतरी वाईट होणार आहे अशी भावना मनात येते. हे लक्षण इतकं तीव्र असतं की पॅनिक अटॅक आल्यासारखं वाटतं. मात्र हे हार्ट अटॅकचं लक्षणं असतं हे समजून घेतलं पाहिजे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT