Heart attack saam tv
लाईफस्टाईल

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी धूम्रपान, उच्च रक्तदाब, रक्तातील साखर, लठ्ठपणा, पोटाची चरबी, ताणतणाव, आहार आणि शारीरिक हालचालींकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. रोजच्या जीवनशैलीत कोणते बदल करावेत आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

गेल्या काही काळापासून हार्ट अटॅक येण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झालीये. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, हार्ट अटॅक एका दिवसात येत नाहीत. मात्र हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यासाठी आपल्या रोजच्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करता येऊ शकतात. लॅन्सेट या जर्नलमध्ये पब्लिश करण्यात आलेल्या अभ्यासांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढवणारे काही घटक समोर आले आहेत.

SAAOL Heart Centerचे प्रमुख आणि प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बिमल छाजेर यांच्या सांगण्यानुसार, हे घटक नियंत्रणात ठेवल्यास हार्ट अटॅकचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो.

डॉ. छाजेर यांच्या मते, हार्ट अटॅकचा धोका वाढवणारे नऊ महत्त्वाचे घटक आहेत. यामध्ये धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन, शरीरातील चरबीचं प्रमाण वाढणं, उच्च रक्तदाब, रक्तातील साखर वाढणं, पोटाची चरबी वाढणं, ताणतणाव, आहाराच्या चुकीच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि रोजचा व्यायाम यांचा समावेश आहे.

हार्ट अटॅकचा धोका कसा कमी करता येईल?

डॉ. बिमल छाजेर सांगतात, “पहिल्या सहा गोष्टी नियंत्रणात ठेवल्या तर हार्ट अटॅकचा धोका 70 ते 80 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. त्यासोबत योग्य आहार, शारीरिक हालचाल आणि रोजचा व्यायाम या तीन गोष्टी केल्यास हा बचाव जवळपास 96 ते 99 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो.”

जीवनशैलीत साधे बदल करणं गरजेचं

यासाठी रोजच्या जीवनात काही साधे बदणं, पोटाची चरबी कमी करणं, ताण कमी करणं आणि योग्य आहार घेणं याकडे लक्ष द्यावं. आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश करणंही महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर रोज चालणं आणि व्यायाम करण्याची सवय लावणं गरजेचं आहे.ल करणं गरजेचं आहे. धूम्रपान आणि तंबाखू टाळणं, रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा.

डॉ. छाजेर यांच्या मते, हार्ट अटॅकवर केवळ उपचार करण्यापेक्षा त्याची कारणं वेळीच नियंत्रणात ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. “रोज चालणं, योग्य आहार घेणं, ताण कमी करणं आणि गरज असल्यास औषधोपचार घेणं यामुळे अनेक लोकांना बायपास सर्जरी किंवा अँजिओप्लास्टीसारख्या प्रोसिजरपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते.”

गंभीर परिस्थितीत उपचार घेणं गरजेचं

मात्र हार्ट अटॅकची अवस्था गंभीर झाल्यास उपचारांची गरज भासू शकते. अशा अवस्थेत नॉन-इन्व्हेसिव्ह म्हणजेच शरीरात मोठी शस्त्रक्रिया न करता केल्या जाणाऱ्या उपचारांमध्ये ‘नॅचरल बायपास’ आणि अँटिऑक्सिडंट थेरपीसारख्या पद्धती उपलब्ध असल्याचंही डॉ. छाजेर यांनी सांगितलंय.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT