Unsolved historical mysteries saam tv
लाईफस्टाईल

Unsolved historical mysteries: इतिहासातील ही ५ रहस्य अजून उलगडलेली नाहीत; काय आहे यामागील गूढ?

Unanswered historical questions: मानवी इतिहास हा अनेक घटना, शोध आणि रहस्यांनी भरलेला आहे. काही रहस्ये कालांतराने उलगडली गेली, तर काही आजही अनुत्तरित आहेत. ही रहस्ये इतिहासकारांना, संशोधकांना आणि सामान्य लोकांनाही आकर्षित करत असतात.

Surabhi Jayashree Jagdish

आपले पूर्वज खूप बुद्धिमान होते, असं मानलं जातं. हे त्यांच्या वास्तुशिल्प, विज्ञान, गणित, औषधशास्त्र अशा अनेक क्षेत्रांतील कामगिरीवरून दिसून येतं. पण त्यांनी काही गोष्टी अशा बनवल्या आहेत, ज्या आजही आधुनिक तंत्रज्ञान असूनही पूर्णपणे समजू शकलेल्या नाहीत. या गोष्टींमधील रहस्य पूर्णपणे उकलण्यात आलेली नाहीत.

इतिहासकार, वैज्ञानिक आणि संशोधक आजही या गूढ गोष्टींचं उत्तर शोधण्यात गुंतले आहेत. आज आपण जगातील अशाच 7 अद्भुत रहस्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

मिसरचे पिरॅमिड

मिसरमधील गिझाच्या पिरॅमिड्सना जगातील प्राचीन गोष्टींपैकी एक आहे. हजारो वर्षांपूर्वी इतक्या अचूकतेने आणि भारी दगडांपासून हे पिरॅमिड बांधले कसे गेले, हे आजही एक कोडं मानलं जातं. त्या काळात न आधुनिक यंत्रं होती, न क्रेन्स... मग हे बांधलं कसं असा प्रश्न आहे.

स्टोनहेंज – इंग्लंडमधील रहस्यमय ठिकाण

इंग्लंडच्या मैदानात उभ्या असलेल्या मोठमोठ्या दगडांची रचना म्हणजे स्टोनहेंज. ही ठिकाणं कुणी बांधली? का बांधली? कशासाठी वापरली गेली? याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. काहींच्या म्हणण्यानुसार, ही एक खगोलशास्त्रीय वेधशाळा होती, तर काहींना वाटतं की हे एक प्रार्थनास्थळ होतं.

एटलांटिस पाण्यात बुडालेलं प्राचीन शहर

ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोने हजारो वर्षांपूर्वी 'एटलांटिस' नावाचं एक शहर समुद्रात गायब झाल्याचं सांगितलं होतं. हे शहर प्रगत, संपन्न आणि अद्भुत होतं असं मानलं जातं. पण हा एक फक्त कल्पित प्रसंग आहे की खरोखरच असं शहर होतं यावर आजही शास्त्रज्ञ एकमत नाहीत.

ईस्टर आयलंडच्या मोआई मूर्ती

चिलीच्या ईस्टर आयलंड या बेटावर मोठ्या आकाराच्या शेकडो मूर्त्या आहेत. यांना 'मोआई' म्हणतात. हे दगड प्रचंड मोठे आणि वजनदार आहेत. मात्र यावेळी प्रश्न असा आहे की, त्या काळात कोणतीही आधुनिक साधनं नसताना या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला कशा हलवल्या गेल्या असतील?

नाझ्का लाईन्स

पेरूमध्ये जमिनीवर कोरलेल्या प्रचंड मोठ्या रेषा आणि आकृत्या आहेत. यामध्ये पक्षी, प्राणी, मानव आणि वेगवेगळ्या रचना दिसून येतात. हे इतकं मोठं आहे की ते फक्त आकाशातूनच पूर्ण दिसतं. पण हजारो वर्षांपूर्वी जमिनीवर इतक्या अचूक रेषा कोणत्या उद्देशानं कोरल्या गेल्या? हे कोण करत होतं? याचं उत्तर आजही कुणाकडे नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कन्नड नगर परिषदेची दुमजली इमारत कोसळली

Leftover Rice: शिळा भात खाल्ल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात?

Late Night Awake: तुम्हालाही रात्री उशिरा पर्यंत जाग राहण्याची सवय आहे? वेळीचं व्हा सावधान नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Dhule Crime : वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावत मित्राचा घातपात; कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, नातेवाईक संतप्त

Mumbai Local: लोकलमधून प्रवासी पडला अन्...; हार्बरची सेवा विस्कळीत|VIDEO

SCROLL FOR NEXT