Signs of Kidney Damage saam tv
लाईफस्टाईल

Signs of Kidney Damage: ही 4 लक्षणं सांगतात की तुमची किडनी आतून सडलीये; शरीरात होणारे हे बदल वेळीच ओळखा

Kidney Disease Symptoms: किडनी खराब होण्यापूर्वी शरीर काही संकेत देतं. लघवीच्या रंगात बदल, पायांना सूज, सतत थकवा, मळमळ आणि त्वचेला खाज येणं ही किडनीच्या आजाराची संभाव्य लक्षणं असू शकतात. जाणून घ्या किडनीच्या समस्येची महत्त्वाची लक्षणं आणि घ्यावयाची काळजी.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या शरीरात किडनीचं काम खूप महत्त्वाचं असतं. किडनी दिवसभर शांतपणे आपलं काम करत असते. शरीरातील घाण आणि हानिकारक पदार्थ बाहेर काढण्याचं काम किडनी करते. त्यामुळे किडनीच्या कामात थोडी जरी अडचण आली तरी त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होऊ शकतो. किडनी खराब होऊ लागल्यास शरीर काही संकेत देतं. हे संकेत वेळीच ओळखणं महत्त्वाचं आहे. कारण या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

किडनी खराब होत असल्यास शरीरात दिसतात ही लक्षणं

लघवीच्या रंगात किंवा प्रमाणात बदल होणं, पाय आणि घोट्यांना सूज येणं, सतत थकवा जाणवणं, मळमळ आणि अशक्तपणा ही किडनीच्या आजाराची काही सामान्य लक्षणं आहेत. पण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. किडनीचा आजार सुरुवातीच्या टप्प्यात असताना अनेकदा कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे कुटुंबात याआधी कोणाला किडनीचा आजार झाला असेल किंवा तुम्हाला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर वेळोवेळी किडनीची तपासणी करून घेणं आवश्यक आहे.

लघवीमध्ये बदल होणं

लघवीमध्ये होणारे बदल हे किडनीच्या त्रासाचे संकेत असू शकतात. नेहमीपेक्षा कमी किंवा जास्त लघवी होणं, रात्री वारंवार लघवीला जावं लागणं, लघवीमध्ये फेस किंवा बुडबुडे दिसणं, लघवीतून रक्त येणं किंवा लघवीचा रंग गडद होणं ही लक्षणं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

पाय आणि घोट्यांना सूज येणं

किडनीचं काम बिघडल्यास ती शरीरातील हानिकारक पदार्थ योग्य प्रकारे बाहेर काढू शकत नाही. त्यामुळे शरीरात जास्तीचं पाणी साचू लागतं. यामुळे पाय, घोटे आणि पोटऱ्यांना सूज येऊ शकते. या प्रकारच्या सुजेला वैद्यकीय भाषेत एडिमा असं म्हणतात.

डोळ्यांभोवती सूज येणं

किडनीच्या आजारात डोळ्यांभोवती सूज येऊ शकते. डोळ्यांना लालसरपणा येणं आणि सूज दिसणं अशी लक्षणंही जाणवू शकतात. ही समस्या अनेकदा उच्च रक्तदाबाशी संबंधित असते.

सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणं

कोणतंही विशेष काम न करता अचानक थकवा जाणवणं किंवा सतत अशक्त वाटणं हेही किडनीच्या त्रासाचं लक्षण असू शकतं. याशिवाय चालताना त्रास होणं किंवा झोपेच्या समस्या जाणवणं हे संकेतही दिसू शकतात.

किडनीच्या आजाराची इतर लक्षणं कोणती?

वरील लक्षणांसोबतच किडनीचा त्रास असल्यास शरीरात आणखी काही बदल दिसू शकतात. त्यामध्ये पुढील लक्षणांचा समावेश होतो.

  • त्वचा कोरडी होणं आणि त्वचेवर खाज येणं

  • भूक न लागणं

  • मळमळ होणं किंवा उलट्या होणं

  • स्नायूंमध्ये गोळे येणं किंवा दुखणं

  • सतत उच्च रक्तदाब राहणं

  • बरगड्या आणि कंबरेच्या हाडांच्या मधल्या भागात दुखणं

  • सतत उचकी लागणं

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार यांना उद्या डिस्चार्ज मिळणार

Milk Rate : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! दुधाच्या दरात ४ रुपयांनी वाढ; कुठे घेतला निर्णय? वाचा

Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर, सुनेत्रा पवारांसह या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट

Political News : इस्त्रायलच्या राजकारणात मोठी उलथापालथ; नेतन्याहूंची सत्ता धोक्यात!

Health Tips: सतत हात-पाय थंड पडतात? शरीरातील 'या' ७ समस्या असू शकतात कारणीभूत!

SCROLL FOR NEXT