four habits tarnish image society saam tv
लाईफस्टाईल

Vidur Niti: समाजात तुमची इमेज खराब करतात 'या' 4 सवयी; वेळीच तुमच्या सवयी सुधारा

four habits tarnish image society: मानवी जीवनात सवयींचा मोठा प्रभाव असतो. चांगल्या सवयींमुळे समाजात आदर मिळतो, तर वाईट सवयींमुळे प्रतिमा खराब होते. काही सवयी अशा असतात की त्या नकळत आपल्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवतात.

Surabhi Jayashree Jagdish

महात्मा विदुर हे महाभारत काळातील विद्वान व्यक्तींपैकी एक होते. त्यांची शिकवण आजही तितकीच प्रभावी आहे. आज आम्ही तुम्हाला महात्मा विदुर यांनी सांगितलेल्या कोणत्या सवयी समाजात तुमची इमेज खराब करू शकतात हे पाहूयात. महात्मा विदुर यांच्या मते, या सवयी तुमच्या जवळच्या लोकांनाही दूर करू शकतात.

जास्त प्रमाणात राग येणं

महात्मा विदुर यांच्या मते, राग आलेला व्यक्ती समाजात त्याची प्रतिमा डागाळतो. अशा लोकांमध्ये इतर अनेक गुण असले तरी राग त्यांच्यावर भारी पडतो. त्यांच्या जवळचे लोकही अशा व्यक्तीपासून दूर जाऊ लागतात. रागामुळे माणसाचे आयुष्य कमी होतं.

स्वतःची स्तुती करणं

विदुर नीती यांच्या मते, लोक स्वतःची स्तुती करणाऱ्यांपासून नेहमी दूर राहतात. असे लोक स्वतःबद्दल कितीही सकारात्मक विचार करत असले आणि लोक त्यांच्याशी कितीही सहमत असले तरी प्रत्यक्षात प्रत्येकजण त्यांच्यापासून दूर राहतात. अशा लोकांना समाजात पसंत केलं जात नाही किंवा त्यांच्या कुटुंबात त्यांचा आदर केला जात नाही.

गरजेपेक्षा जास्त बोलणं

गरजेपेक्षा जास्त बोलणारी व्यक्ती स्वतःची ऊर्जा वाया घालवत नाही तर त्यांचे शब्द इतरांना त्रासदायक वाटू लागतात. लोक सहसा अशा लोकांना टाळतात. हळूहळू लोक त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागतात. त्यांच्या जास्त बोलण्यामुळे समाजात त्यांची इमेज खराब होतते. विदुर म्हणतात की, एखाद्या व्यक्तीने आवश्यक तेवढंच बोलावं.

लोभी असणं

प्रत्येकजण लोभी व्यक्तीला नेहमीच टाळतात. विदुर म्हणतात की, लोभ कधीही माणसाला यशस्वी होऊ देत नाही. लोभी राहण्याची वाईट सवय केवळ तुमची इमेज खराब करत नाही तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत. लोभ ही एक अशी समस्या आहे जी माणसाला शांत जीवन जगू देत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Border 2 OTT : 'बॉर्डर 2' घरबसल्या कसा पाहाल? सनी देओलचा चित्रपट ओटीटीवर कधी अन् कुठे प्रदर्शित होणार? वाचा अपडेट

EPFO: सेल्फीद्वारे अ‍ॅक्टिव्ह करता येणार UAN नंबर; EPFOने सुरु केली फेस आयडी सर्व्हिस

Shocking: फुटबॉलचा सामना सुरू असताना अंदाधुंद गोळीबार, ११ जणांचा जागीच मृत्यू

Diljit Dosanjh: 'बॉर्डर २'चं सक्सेस बघून भावुक झाला दिलजीत दोसांझ, म्हणाला- मला कधीच माहित नव्हतं...

Black carrot halwa: घरच्या घरी कसा बनवाल काळ्या गाजराचा हलवा?

SCROLL FOR NEXT