हृदयरोग हे जगभरातील मृत्यूचे मुख्य कारण आहे.
कुटुंबातील हृदयरोगाचा इतिहास महत्त्वाचा असतो, तो डॉक्टरांना सांगणे गरजेचे आहे.
सकाळी गरम पाणी + लिंबू + मध घेणे हृदयासाठी धोकादायक असू शकते.
हार्ट अटॅक किंवा हृदयाचे रोग इतर ही एक अत्यंत गंभीर समस्या आहे. हृदयाचे आजार हे जगभर मृत्यूचं मुख्य कारण म्हणून ओळखले जातात. वय, अनुवांशिकता, कुटुंबातील आजारांचा इतिहास यावर आपलं नियंत्रण नसतं. मात्र आहार, जीवनशैली आणि काही सवयी मात्र आपण निश्चितपणे बदलू शकतो.
ज्यांच्या घरात कोणाला हार्ट अटॅक, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार यांचा त्रास झाला आहे त्यांनी स्वतःकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण काही प्रकारचे हृदयरोग हे थेट आपल्या जीन्सशी संबंधित असतात आणि पिढ्यानपिढ्या पुढे जातात. आपल्या कुटुंबाचा आरोग्यविषयक इतिहास डॉक्टरांसोबत शेअर करणं गरजेचं असतं. त्यानुसार तुम्हाला वेळेवर तपासणी व योग्य मार्गदर्शन मिळू शकतं.
खूप लोकांची सकाळची सुरुवात एक ग्लास गरम पाणी, लिंबाचा रस आणि थोडासा मध घालून होते. ही सवय पचनासाठी फायदेशीर असते मात्र हृदयासाठी मात्र ही सवय धोकादायक ठरू शकते.
तज्ज्ञ सांगतात की, लिंबू आणि मध यामुळे काही वेळातच शरीरात इन्सुलिनचं प्रमाण झपाट्याने वाढतं, ज्यामुळे ब्लड शुगरमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. हे वाढलेले साखरेचं प्रमाण दीर्घकाळ टिकल्यास हृदयाला धोका पोहोचू शकतो.
गोड खाणं फारस वाईट नाही, मात्र रोजच प्रत्येक जेवणानंतर गोड खाल्लं तर मात्र ती सवय बनते. जेवणानंतर गोड खाल्ल्याने शरीरात इन्सुलिनची पातळी खूप वाढते त्याचप्रमाणे वजन वाढतं आणि कोलेस्टेरॉलही असंतुलित होतं. ही साखरेची सवय हळूहळू तुमच्या हृदयाच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू लागते. म्हणून शक्यतो गोड खाणं विशेष प्रसंगी किंवा मधूनच ठेवा.
काही लोक रात्री 10-11 वाजता जेवण करतात आणि लगेच झोपतात. ही सवय पचनावर परिणाम करतेच पण त्याचबरोबर रक्तातील साखर आणि ट्रायग्लिसराईड्स वाढवते. हे दोन्ही घटक हृदयविकाराचा धोका वाढवतात. विशेषत: ज्यांना कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास आहे त्यांनी 7 वाजेपर्यंत रात्रीचं जेवण करून घ्यावं. यामुळे पचन व्यवस्थित होतं आणि शरीरही विश्रांतीसाठी तयार राहतं.
जास्त प्रमाणात साखर
ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट्स
जास्त मीठ
कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थ
हंगामी फळं आणि भाज्या
ओट्स, ब्राऊन राईस, ज्वारीसारखे संपूर्ण धान्य
मासे
लो-फॅट दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
बदाम, अक्रोड
ऑलिव्ह ऑईल किंवा कमी सॅच्युरेटेड फॅट असलेलं तेल
दीर्घकाळ बसून राहिल्यास शरीरात रक्तप्रवाह कमी होतो. यामुळे रक्तातील चरबी एकाच ठिकाणी साचते आणि हळूहळू धमन्यांमध्ये अडकून राहते. यालाच अॅथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. सतत एका जागी बसल्यामुळे शरीरातील स्नायूंनी रक्त हृदयाकडे पोहोचवण्याचा वेग कमी होतो. यामुळे रक्तदाब आणि इन्सुलिन रेसिस्टन्स वाढतो, जे दोन्ही गोष्टी हृदयासाठी अपायकारक ठरतात.
हृदयरोगाच्या जोखमी वाढवणारे 2 घटक कोणते?
अनुवांशिकता आणि अयोग्य जीवनशैली.
सकाळी लिंबू आणि मध का टाळावे?
ब्लड शुगर वाढू शकते, जे हृदयासाठी धोकादायक आहे.
जेवणानंतर गोड खाल्ल्याने काय होते?
वजन आणि कोलेस्ट्रॉल वाढतो, हृदयावर परिणाम होतो.
रात्री उशिरा जेवण का टाळावे?
रक्तातील साखर आणि चरबी वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
हृदयासाठी चांगले पदार्थ कोणते?
फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, मासे, बदाम, ऑलिव्ह ऑईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.