Budhaditya Yog 2023 Saam Tv
लाईफस्टाईल

Budhaditya Yog 2023 : बुधादित्य राजयोगामुळे या 3 राशींची होणार चांदी ! प्रगतीचे अनेक नवे मार्ग खुलतील

Budh Gochar : सूर्य सध्या वृषभ राशीमध्ये स्थित असल्यामुळे 15 जून पर्यत हा त्याच राशीत राहील.

कोमल दामुद्रे

Budh Surya Yuti in Vrishabha Rashi 2023 June : ज्योतिष्यशास्त्रानुसार ग्रहांचे सतत परिवर्तन होत असते. सूर्य सध्या वृषभ राशीमध्ये स्थित असल्यामुळे 15 जून पर्यत हा त्याच राशीत राहील. वृषभ राशीत सूर्याचे भ्रमण झाल्यानंतर आता 7 जूनला बुधाचेही वृषभ राशीत संक्रमण होणार आहे.

वृषभ राशीत सूर्य व बुधाच्या संक्रमणामुळे बुध-सूर्य संयोग तयार होत आहे. बुध आणि सूर्य यांच्या संयोगाने बुधादित्य राजयोग तयार होतो जो शुभ फल देतो. बुधादित्य राजयोग सर्व 12 राशींवर प्रभाव टाकेल. दुसरीकडे, 3 राशीच्या लोकांसाठी हा बुधादित्य योग भाग्यवान सिद्ध होईल. या लोकांना भरपूर पैसा (Money) मिळण्याची आणि मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे.

बुधादित्य राजयोग या लोकांचे भाग्य उजळवेल

१५ जूनपर्यंत सूर्य वृषभ राशीत राहील आणि त्यानंतर मिथुन राशीत प्रवेश करेल. यामुळे बुधादित्य राजयोग फक्त 7 दिवस राहणार आहे. 3 राशी असलेल्यांच्या करिअरमध्ये (Career) यश मिळेल, उत्पन्नात वाढ होईल.

1. वृषभ :

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग अतिशय शुभ आहे. बुधादित्य राजयोग फक्त वृषभ राशीत तयार होत असून या लोकांसाठी तो खूप भाग्यवान ठरेल. तुमचे काम खूप चांगले होईल. करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसाय (Business) चांगला चालेल. जोडीदारासोबत खूप चांगले होईल. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित केले जाऊ शकतात.

2. सिंह :

ज्योतिष शास्त्रानुसार हा बुधादित्य राजयोग सिंह राशीच्या लोकांना नोकरी-व्यवसायात खूप लाभ देईल. सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे आणि बुधादित्य योग सूर्य आणि बुध यांच्या संयोगानेच तयार होतो. बुधादित्य राज योगात नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला प्रमोशन मिळू शकते. राजकारणात सक्रिय लोकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.

3. कर्क :

बुधादित्य योग कर्क राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. त्यांची आर्थिक समस्या दूर होईल. धनलाभ होईल. उत्पन्नाचे नवीन साधन मिळेल. गुंतवणूकीतून लाभ होईल. घरात मांगलिक किंवा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यवसायात नफा वाढेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Suraj Chavan Dance: बिग बॉस फेम सूरजचा नाद नाय! 'तांबडी चामडी' गाण्यावर केला डान्स; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT