Female fertility by age saam tv
लाईफस्टाईल

Female fertility by age: वयाच्या ३० आणि ४० नंतर IVFमध्ये असतो मोठा फरक; तज्ज्ञ सांगतात नेमकं काय बदलतं?

IVF difference 30 and 40: आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि करिअरच्या प्राधान्यांमुळे अनेक महिला ३० किंवा ४० वर्षांनंतर कुटुंब नियोजन करण्याचा विचार करतात. अशावेळी, नैसर्गिकरित्या गर्भधारणा होण्यास अडचणी आल्यास, इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) हा एक महत्त्वाचा पर्याय ठरतो.

Surabhi Jayashree Jagdish

पालकत्वाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हल्ली बहुतांश जोडपी इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) चा पर्याय निवडताना पहायला मिळतात. एककीकडे आयव्हीएफ अनेक जोडप्यांसाठी आशेचे किरण ठरत असताना दुसरीकडे वय हे त्या प्रक्रियेच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं दिसून येतं.

इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) ही एक प्रक्रिया आहे जिथे स्त्रीबीज प्रयोगशाळेत शुक्राणूंनी फलित केली जातात आणि नंतर गर्भाशयात ठेवली जातात. यामुळे प्रजनन समस्यांना तोंड देणाऱ्या जोडप्यांना मूल होण्यास आणि पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत होते.

पुण्यातील अंकुरा महिला आणि बाल रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि वंध्यत्व विशेषज्ञ डॉ. अश्विनी राठोड यांनी सांगितलं की, आयव्हीएफ विशेषतः अशा महिलांसाठी उपयुक्त आहे ज्यांच्या फॅलोपियन ट्युब ब्लॉक झालेल्या आहेत तसंच स्त्रीबीजांची संख्या आणि दर्जा खालावणे, पॉलीसिस्टिक अंडाशय सिंड्रोम किंवा वंध्यत्वासारख्या आजारांचे निदान झालं आहे. हे शुक्राणूंची संख्या कमी असलेल्या पुरुषांसाठी देखील फायदेशीर ठरते. ज्या वयात स्त्री आयव्हीएफ करते त्यावर त्या प्रक्रियेचं यश अवलंबून असते.

३० व्या वर्षी आयव्हीएफ

ज्या महिला ३० व्या वर्षी आयव्हीएफ करण्याचा पर्याय निवडतात त्यांना चांगले परिणाम मिळतात. या वयात स्त्रीबीज निरोगी असतात, हार्मोन्सची पातळी अधिक स्थिर असते आणि शरीर प्रजननासंबंधी औषधांना चांगला प्रतिसाद देखील देते. या वयात गर्भपात आणि अनुवांशिक समस्यांचा धोका देखील कमी असतो. सरासरी, या वयोगटात आयव्हीएफ यशस्वी होण्याचे प्रमाण अधिक असते.

४० व्या वर्षी केलं जाणारं आयव्हीएफ

या वयात आयव्हीएफ प्रक्रिया शक्य आहे, परंतु अनेक जोडप्यांसाछी ती आव्हानात्मक ठरु शकते. जेव्हा एखादी महिला चाळीशीत पोहोचते तेव्हा तिच्या अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता नैसर्गिकरित्या वयानुसार कमी होते. अशावेळी अधिक आयव्हीएफ चक्रांची आवश्यकता भासू शकते आणि काही महिलांना दात्याच्या स्त्रीबीजांची आवश्यकता भासू शकते. या वयात गर्भपात आणि गर्भधारणेच्या गुंतागुंतीचा धोका देखील जास्त असतो. तरीही, ४० व्या वर्षीच्या अनेक महिला योग्य वैद्यकीय मार्गदर्शनाने गर्भधारणा साध्य करु शकतात.

या आहेत महत्त्वाच्या टिप्स

आयव्हीएफ उपचार सुरू करण्यापूर्वी, अशा तज्ञांना भेटणं आवश्यक आहे जे तुम्हाला प्रक्रियेबद्दल योग्य मार्गदर्शन करतील. तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्वरीत प्रजनन क्षमता मूल्यांकन करा, निरोगी वजन आणि योग्य जीवनशैली बाळगा, धूम्रपान, मद्यपान आणि कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन टाळा, योग आणि ध्यान करून तणावावर मात करा, नियमितपणे डॉक्टरांच्या संपर्कात रहा, दररोज व्यायाम करून शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा आणि जंक फुड, प्रक्रिया केलेले पदार्थ, तेलकट आणि हवाबंद डब्यातील पदार्थ खाणं टाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT