हा दिवस पुरुषांचे आरोग्य, कल्याण आणि समाजासाठी त्यांचे योगदान लक्षात ठेवण्यासाठी आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुमचे लक्ष एका गंभीर समस्येकडे घेऊन जात आहोत, तो म्हणजे पुरुषांमध्ये वेगाने पसरणारे आजार. होय, खराब जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे आज पुरुष अनेक गंभीर आजारांना बळी पडत आहेत (Diseases Affecting Men), जे एकेकाळी सामान्यतः स्त्रियांशी संबंधित होते. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि दिवसेंदिवस वाढणारा ताण यामुळे पुरुषांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे.
१. हृदयविकार: हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात हे पुरुषांच्या मृत्यूच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे. आम्ही चुकीच्या खाण्याच्या सवयी, धूम्रपान आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही यामागची प्रमुख कारणे आहेत.
२. मधुमेह : पुरुषांमध्ये टाइप २ मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. कौटुंबिक इतिहासाव्यतिरिक्त, लठ्ठपणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव हे देखील एक प्रमुख कारण आहे.
३. कर्करोग: प्रोस्टेट कर्करोग हा पुरुषांमध्ये सर्वात सामान्य कर्करोग आहे. याशिवाय फुफ्फुसाचा कॅन्सर, कोलन कॅन्सर आणि यकृताचा कॅन्सर देखील आज पुरुषांवर गंभीरपणे परिणाम करत आहे.
४. मानसिक आरोग्य समस्या: नैराश्य, चिंता आणि इतर मानसिक आरोग्यच्या समस्या पुरुषांमध्येही सामान्य आहेत. कामाचा ताण, कौटुंबिक समस्या आणि सामाजिक अपेक्षा ही यामागची प्रमुख कारणे आहेत.
५. लैंगिक आरोग्याच्या समस्या: इरेक्टाइल डिसफंक्शन, अकाली वीर्यपतन आणि लैंगिक आरोग्याशी संबंधित इतर समस्यांचा केवळ पुरुषांच्या आरोग्यावरच नाही तर त्यांच्या आत्मविश्वासावरही परिणाम होतो. याशिवाय काही प्रकरणांमध्ये या समस्यांमुळे वैवाहिक नातेही बिघडते.
१. चुकीच्या खाण्याच्या सवयी: जंक फूड, अल्कोहोल आणि तंबाखूच्या सेवनामुळे हृदयविकार, लठ्ठपणा आणि कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.
२. शारीरिक हालचालींचा अभाव: शारीरिक हालचालींचा अभाव हे लठ्ठपणा, हृदयविकार आणि मधुमेहाचे प्रमुख कारण असू शकते.
३.ताणतणाव: कामाचा ताण, कौटुंबिक समस्या आणि मानसिक आरोग्याच्या समस्या देखील या आजारांना प्रोत्साहन देतात.
४.धूम्रपान: हृदयविकार, फुफ्फुसाचा कर्करोग आणि अशा अनेक आजारांमागे धूम्रपान हे एक प्रमुख कारण आहे.
५.लठ्ठपणा: हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या अनेक आजारांचा धोका वाढवण्यातही लठ्ठपणाचा मोठा वाटा आहे.
Edited by-Archana Chavan
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.