Marriage 
लाईफस्टाईल

Marriage: आत्या-मामा ऐकलं का! नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लग्नासाठी फक्त १८ च आहेत शुभ मुहूर्त; कधी सुरू होणार लग्नसराईचा धूमधडाका

Bharat Jadhav

सनातन धर्मात विवाह सोहळ्यासाठी शुभ मुहूर्ताची वाट पाहिली जाते. ज्योतिषांच्या मते शुभ मुहूर्ताशिवाय होणारे विवाह यशस्वी होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे प्रत्येक पालक आपल्या मुलांचे लग्न ठरविताना निश्चितच योग्य वेळेची जुळवाजुळव करतात. त्यानंतर लग्नाचा संपूर्ण कार्यक्रमाची प्लानिग करत असतात.

दरवर्षी देवउठनी एकादशीनंतर हा विवाहसोहळा सुरू होत असतो. यावर्षी देवूउठणी एकादशी कधी आहे आणि लग्नासाठी किती शुभ मुहूर्त आहेत हे जाणून घेऊ.

कधी आहे देवउठनी एकादशी?

ज्योतिषांच्या मते यावर्षी देवउठनी एकादशी १२ नोव्हेंबर २०२४ रोजी आहे. यावर्षी म्हणजेच १ जानेवारीनंतर लग्नासाठी एकूण ७१ शुभ मुहूर्त उपलब्ध आहेत. त्यापैकी आता ३१ डिसेंबरपर्यंत फक्त १८च शुभ मुहूर्त आहेत.

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लग्नासाठी शुभ मुहूर्त

नोव्हेंबर महिन्याचा पहिला शुभ मुहूर्त मंगळवारी १२ नोव्हेंबर रोजी येईल, म्हणजेच देवउठनी एकादशीपासून लग्नसराईचा धूम धडाका सुरू होणार आहे. यानंतर नोव्हेंबर महिन्यात १६, १७ १८, २२, २३, २४, २५, २८ आणि २९ नोव्हेंबर या तारखांना शुभ मुहूर्त असतील. डिसेंबर महिन्यात ३, ४, ५, ९, १०, ११, १३ आणि १४ या तारखांना लग्नांचा बँण्ड वाजेल. विशेष म्हणजे १४ डिसेंबरच्या मध्यरात्री खरमास सुरू होतील, त्यामुळे त्या तारखेला दिवसभरात लग्न करणे शुभ राहील. रात्री लग्न केल्याने अनर्थ होऊ शकतो.

दाम्पत्य जीवनावर त्याचा काय परिणाम होतो?

सनातन धर्माच्या अभ्यासकांच्या मते ग्रहांची दशा आणि दिशा यांचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडत असतो. त्यांच्या दिशा आणि स्थितीमुळे शुभ काळ तयार होत असतो. या शुभ मुहूर्तांमध्ये कोणतेही कार्य केले तरी त्यात यश मिळण्याची दाट शक्यता असते. त्याचप्रमाणे या शुभ काळात होणारे विवाह देखील यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. या शुभ तारखांना लग्न करणाऱ्या जोडप्यांचे वैवाहिक जीवन सुखी असते.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs AUS W: हरमनप्रीत एकटी लढली! सामना निसटला, मात्र अजूनही सेमीफायनलमध्ये जाण्याची संधी; पाहा समीकरण

Dombivli Politics: डोंबिवलीत ठाकरे गट - भाजपमध्ये जुंपली, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Funeral: बाबा सिद्दिकींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, VIDEO

Marathi News Live Updates: नाशिकमध्ये जरांगे-भुजबळ समर्थक आमनेसामने

Baba Siddique : मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी तिसरा आरोपीही अटकेत, कोण आहे शुबू लोणकर? वाचा...

SCROLL FOR NEXT