Dussehra 2024 Upay: दसऱ्याच्या दिवशी घरात किती दिवे लावाल? जाणून घ्या योग्य नियम, वेळ आणि दिशा

Dussehra 2024 Upay: विजयादशमीचा दिवस हा वाईटावर चांगल्याचा विजय याचं प्रतीक मानला जातो. हिंदू धर्मातील शास्त्रामध्ये दसऱ्याच्या दिवशी घरात दिवा लावण्याच्या नियमांबाबत सांगण्यात आलंय.
Dussehra 2024 Upay
Dussehra 2024 Upaysaam tv
Published On

आज १२ ऑक्टोबर म्हणजे दसऱ्याचा दिवस आहे. शारदीय नवरात्रीच्या महानवमीनंतर म्हणजेच दुसऱ्या दिवशी दसऱ्याचा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये दसऱ्याच्या सणाला खूप महत्त्व आहे. आजच्या दिवशी रामाने रावणावर विजय मिळवला होता म्हणून या दिवशी रामाची पूजा करण्याची प्रथा आहे. या दिवशी रावणाचं दहन देखील केलं जातं.

विजयादशमीचा दिवस हा वाईटावर चांगल्याचा विजय याचं प्रतीक मानला जातो. आज या दसऱ्याच्या दिवशी घरात दिवा लावण्याची पद्धत आहे. हिंदू धर्मातील शास्त्रामध्ये दसऱ्याच्या दिवशी घरात दिवा लावण्याच्या नियमांबाबत सांगण्यात आलंय. हे नियम काय आहेत, दसऱ्याच्या दिवशी कधी दिवा लावायचा याची माहिती घेऊयात.

Dussehra 2024 Upay
Dussehra 2024 Horoscope: विजयादशमीला बनले हे शुभ संयोग; 'या' राशींची अडकलेली कामं होणार पूर्ण

विजयादशमीला लावण्यात येतो दिवा

आपल्यापैकी काही लोकं दसऱ्याच्या दिवशी घरी दिवे लावतात. शास्त्रांमध्ये या दिव्यांबाबत काही नियम सांगण्यात आले आहेत. मात्र या दिवशी किती आणि कसे नियम लावावेत, हे तुम्हाला माहितीये का?

किती दिवे लावालेत?

ज्योतिष्य शास्त्रानुसार दसऱ्याला तुमच्या घरातील सर्व दिशांना दिवे लावला पाहिजेत. यावेळी घरामध्ये 10 दिवे लावू शकता. या दिव्यांसाठी तुम्ही मोहरीच्या तेलाचा वापर करावा. त्याचप्रमाणे तुळशी, पिंपळ, शमी, वट आणि केळी या हिंदू धर्मातील पूजनीय वनस्पतींसाठी 5 दिवे लावा. या दिवशी खास भगवान राम यांची पूजा केली जाते. त्यामुळे भगवान रामासाठी खास दिवा लावला पाहिजे.

घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवाल दिवा?

ज्योतिषशास्त्रानुसार, विजयादशमीच्या दिवशी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, पूर्व-उत्तर ईशान्य, आग्नेय , पश्चिम-उत्तर (वायव्य), नैऋत्य , ऊर्ध्वगामी या दिशांना दिवे लावणं फायदेशीर मानलं जातं.

कोणत्या वेळी दिवा लावावा?

मात्र या दिवशी कोणत्या वेळेला तुम्ही दिवे लावताय हे देखील महत्त्वाचं आहे. प्रभू रामासाठी सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावावा. याशिवाय उरलेले दिवे तुम्ही संध्याकाळी लावू शकता. दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळची वेळ शुभ मानली जाते.

Dussehra 2024 Upay
Dussehra 2024 Wishes : दसऱ्यानिमित्त नातेवाईकांसह मित्रमैत्रीणींना द्या या खास शुभेच्छा; वाचा संपूर्ण यादी

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com