आजकाल महिलांमध्ये हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नेल आर्ट आणि नेल एक्स्टेंशनची खूप लोकप्रियता वाढली आहे. यामध्ये विशेषतः जेल नेल पॉलिशचा वापर केला जातो, जो नखांची सुंदरता वाढवतो आणि दीर्घकाळ टिकतो. त्यामुळे नखे आकर्षक दिसतात, परंतु त्याचा नियमित वापर केल्यास काही तोटे देखील असू शकतात. जेल नेल पॉलिश सतत वापरण्यामुळे नखांची प्रकृती खराब होऊ शकते, आणि नखे तुटण्याची किंवा छिद्र पडण्याची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणून, जेल नेल पॉलिशचा वापर करत असताना त्याचे योग्य देखभाल आणि मर्यादा पाळणे आवश्यक आहे, ज्यामुळे समस्या टाळता येऊ शकतात.
जेल नेल पॉलिशचा वारंवार वापर नाखांची स्थिती खराब करू शकतो, ज्यामुळे त्या पातळ आणि कमकुवत होऊ शकतात. जेल पॉलिश काढताना नाखांचा वरचा थरही निघून जाऊ शकतो, परिणामी नखांमध्ये क्रॅक येऊ शकतात. त्यामुळे, त्याचा अतिरेकी वापर टाळणे आवश्यक आहे.
जेल नेल पॉलिशमध्ये अनेक हानिकारक रसायने असतात, ज्यात फॉर्मल्डिहाइड आणि टोल्यूइन हे प्रमुख आहेत. हे रसायन नाखांवर ऍलर्जी, जळजळ किंवा इन्फेक्शन होऊ शकतात. याशिवाय, हे रसायने नखांच्या संरचनेला नुकसान पोहोचवू शकतात, तसेच त्वचेवरही प्रतिकूल प्रभाव पडू शकतो. त्यामुळे, जेल नेल पॉलिशचा वापर काळजीपूर्वक करणे महत्त्वाचे आहे.
जेल नेलपॉलिश सुकवण्यासाठी UV किंवा LED दिव्याचा वापर केला जातो, परंतु अतिनील (UV) किरण त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. यामुळे त्वचेवर सुरकुत्या येऊ शकतात किंवा इतर नुकसान होऊ शकते. सतत संपर्कात राहिल्यास त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे, UV दिव्याच्या संपर्कात कमी राहणे आणि काळजी घेणे आवश्यक आहे.
जेल नेल पॉलिश काढण्यासाठी एसीटोनचा वापर केल्याने नखे आणि त्वचा कोरडी होऊ शकतात. जर पॉलिश नीट काढली नाही, तर नखे सोलून कमजोर होऊ शकतात. नखांच्या कड्यांची स्वच्छता न केल्यास बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता असते. तसेच, सलूनमध्ये स्वच्छतेच्या साधनांचा योग्य वापर न केल्यास संसर्गाचा धोका वाढतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.