Spouted Peanuts Benefits
Spouted Peanuts Benefits  Saam Tv
लाईफस्टाईल

Spouted Peanuts Benefits : मोड आलेले शेंगदाणे खाण्याचे बहूगुणी फायदे!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्या रोजच्या जेवणात शेंगदाण्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. घरगुती कांदे पोह्यांपासून, चिक्की, चटणी ते थेट चखण्यातील खारे शेंगदाण्यापर्यंत, शेंगदाणा सगळीकडे फिट बसतो. जेवणात तर फिट बसतो पण त्याचे आरोग्यासाठी (Health) फायदे देखील खूप आहेत.

व्हिटॅमिन-E, फॉलेट, नियासिन, मॅगनीझ आणि प्रोटीन अशा अनेक हेल्दी घटकांनी भरलेल्या या शेंगदाण्याचे आरोग्यासाठी कोणते फायदे (Benefits) आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत.

मोड आलेले शेंगदाणे खाण्याचे पुरुषांना अनेक फायदे होत असल्याचं दिसून आलं आहे. मोड आलेल्या शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन, प्रोटिन, फायबर, अँझायम, ॲमिनो ॲसिड यासारखे अनेक आरोग्यपूर्ण घटक असतात. त्याचप्रमाणे हे मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि इतर अनेक पोषक घटकांनी समृद्ध असतात. जाणून घेऊया, नेमक्या कुठल्या समस्या त्यामुळे दूर होऊ शकतात.

१. पोटावरील अतिरिक्त चरबी -

वाढलेलं पोट ही बहुतांश पुरुषांची समस्या असते. मोड आलेल्या शेंगदाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतं. त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ होतं. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. यात मुबलक प्रमाणात प्रोटिनही असतं. त्यामुळे वारंवार भूक लागण्याचे प्रकार बंद होतात. अतिरिक्त आणि अनावश्यक खाणं बंद झाल्यामुळे वजन कमी होण्याचा वेग वाढू लागतो.

२. मसल बिल्डिंगसाठी फायदेशीर -

मोड आलेले शेंगदाणे हे मसल बिल्डिंगसाठी उत्तम मानले जातात. स्नायूंचा आकार वाढवण्यासाठी आणि तो टिकवून ठेवण्यासाठी याची मोठ्या प्रमाणावर मदत होत असते. ज्यांचे स्नायू कमकुवत आहेत, त्यांना ते सशक्त बनवण्यासाठीदेखील मोड आलेल्या शेंगदाण्यांचा चांगला उपयोग होतो.

३. कमी स्टॅमिना -

ज्या व्यक्तींचा स्टॅमिना कमी असतो, त्यांना मोड आलेले शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यातील प्रोटिन स्टॅमिना वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं. मोड आलेल्या शेंगदाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात कॅलरीजही असतात. त्यामुळे पोट भरायला त्याची मदत होते.

४. केसगळतीवर उत्तम उपाय -

शेंगदाण्यात फॉलेटचं प्रमाण चांगलं असतं. यात असणाऱ्या मुबलक जीवनसत्त्वांमुळे केसांची निकोप वाढ होण्यास मदत होते. फोलेटच्या कमतरतेमुळेच केस गळू लागतात आणि खराब होऊ लागतात. त्याशिवाय मोड आलेल्या शेंगदाण्यात मॅग्नेशिअमही भरपूर असतं.

त्यामुळे केस मजबूत होण्यास मदत होते. जर पुरुषांना टक्कल पडायला सुरुवात झाली असेल किंवा त्यांचे केस गळायला सुरुवात झाली असेल, तर त्यांना शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो.

५. हृदयाशी संबंधित आजार -

३० ते ४० वयोगटातील पुरुषांना हृदयाशी संबंधित काही ना काही आजार सुरु होण्याची शक्यता असते. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असणारे मोड आलेले शेंगदाणे खायला सुरुवात केल्यामुळे हृदयाशी संबंधित आजारांपासून वाचण्यासाठी आवश्यक घटक शरीराला मिळतात.

मोड आलेल्या शेंगदाण्यात असणारे अँटिऑक्सिडंट्स हे रक्तवाहिन्यांना शुद्ध ठेवण्याचं काम करत असतात. रक्तातील साखर नियंत्रित करणे आणि हृदयाचं आरोग्य ठिक ठेवणे, ही कामंदेखील शेंगदाण्यामुळे होतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

Today's Marathi News Live: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी भाजपचं आंदोलन

RR-KKR चा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला तर? कोणाचं होणार नुकसान?

Sangli News: पैज लावाल तर तुरुंगात जाल! निकालावरुन पैज लावणं अंगलट आलं, सांगलीत दोन मित्रांच्या गाड्याही जप्त

Anti Diet Plan म्हणजे काय? कोणासाठी आहे फायदेशीर

SCROLL FOR NEXT