Petrol Diesel Price Saam Tv
लाईफस्टाईल

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! महाराष्ट्रातील 'या' शहरात विकलं जातंय सर्वात महाग पेट्रोल

सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) आजचे नवे भाव जारी करण्यात आले

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) आजचे नवे भाव जारी करण्यात आले आहेत. आज देखील देशातील महानगरांमध्ये पेट्रोल- डिझेलच्या भावात कोणताही बदल करण्यात आला नाही. दिल्ली, मुंबई बरोबरच देशामधील महानगरात पेट्रोल- डिझेलच्या भावामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. दरम्यान, देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. इंधन भाव गगनाला भिडले आहेत. देशामध्ये सध्या सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्टब्‍लेयरमध्ये विकले जात आहे. तर सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) मिळत आहे.

इंडियन ऑईलने जारी केलेल्या किमतींनुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलचे भाव ९१.४५ रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये (Parbhani) पेट्रोलचे भाव १२३.४७ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. देशाच्या राजधानी शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोलचे भाव १०५.४१ रुपये आहे. तेल कंपन्यांनी २२ मार्च नंतर सलग १४ वेळेस भाववाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल- डिझेलच्या भाव वाढीला ब्रेक लागला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेल १०.२० रुपयांनी महाग झाले आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या भावामध्ये परत एकदा वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे.

हे देखील पहा-

महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांतील पेट्रोल-डिझेलचे दर

शहरं पेट्रोलचे दर (प्रति लिटर) डिझेलचे दर (प्रति लिटर)

मुंबई १२०.५१ रुपये १०४.७७ रुपये

पुणे १२०.६० रुपये १०३.२८ रुपये

नाशिक १२०.०२ रुपये १०२.७३ रुपये

परभणी १२३.५१ रुपये १०६.०८ रुपये

औरंगाबाद १२०.६३ रुपये १०३.३२ रुपये

कोल्हापूर १२०.६४ रुपये १०३.३५ रुपये

नागपूर १२१.०३ रुपये १०३.७३ रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nysa Devgan : अजय देवगन-काजोलची लाडकी लेक झाली ग्रॅज्युएट, नीसाच्या पदवी प्रदान समारंभाचा VIDEO समोर

Pali Crime News : रायगडच्या पालीमध्ये सशस्त्र दरोडा; रात्रीच्या अंधारात पाच घरांमध्ये घातला धुमाकूळ

Mumbai - Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गाचं काम अपूर्ण; टोल नाके मात्र पूर्ण, शरद पवार गट आक्रमक | VIDEO

Shravan Somvar Vrat: श्रावणी सोमवारच्या उपवासाला काय खावे अन् काय खाऊ नये

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

SCROLL FOR NEXT