Surya Grahan 2026 saam tv
लाईफस्टाईल

Surya Grahan 2026: या दिवशी लागणार वर्षातील पहिलं सूर्य ग्रहण; पाहा कोणावर पडणार याचा अधिक प्रभाव

first solar eclipse 2026: २०२६ मधील पहिले सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे. हे ग्रहण भारतात काही प्रमाणात दिसणार असून धार्मिक परंपरेनुसार सूतक काल लागू होईल. ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहणाचा काही राशींवर विशेष परिणाम होणार आहे.

Surabhi Jayashree Jagdish

यंदाच्या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण १७ फेब्रुवारी रोजी लागणार आहे. फाल्गुन महिन्यातील अमावस्येला सूर्य ग्रहण लागणार आहे. मुख्य म्हणजे हे कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे. हे ग्रहण खासकरून अंटार्क्टिका, आफ्रिकेचे काही भाग आणि दक्षिण अटलांटिक महासागराच्या भागात दिसणार आहे.

भारतात दिसणार ग्रहण?

हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे सुतक काळ वैध राहणार नाही. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:२६ वाजता हे ग्रहण सुरू होणार आहे आणि रात्री ८ वाजता संपणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशी आणि नक्षत्रांवर या ग्रहणाचा परिणाम होईल.

२०२६ चे पहिलं सूर्यग्रहण कुंभ आणि शतभिषा नक्षत्रात होणार आहे, त्यामुळे या ग्रहणाचा या राशी आणि नक्षत्राशी संबंधित लोकांवर सर्वात जास्त परिणाम होईल. या लोकांना त्यांच्या आरोग्याबाबत आणि आर्थिक बाबींबाबत सावधगिरी बाळगावी लागणार आहे. या काळात तुमचे काही निर्णय चुकीचे ठरण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलीये. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागू शकते.

कोणत्या राशींनासाठी धोक्याची घंटा

सिंह रास

या राशींच्या वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात. तुमच्या रिलेशनशिपमध्येही अडचणी येणार आहेत.

वृश्चिक रास

घरच्या सुख-सुविधांमध्ये बाधा येण्याची शक्यता असते. तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची तब्येत बिघडू शकते.

कुंभ राशी

मानसिक अधिक असणार आहे. तुमची काम अपूर्ण राहू शकतात.

सूर्य ग्रहणाच्या वेळी काय करू नये?

ग्रहणाच्या काळात भगवान सूर्याला समर्पित मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा. यामुळे ग्रहणाचे नकारात्मक परिणाम टाळण्यास मदत होते. शिवाय ग्रहण संपल्यानंतर स्नान करा आणि दान करा. ग्रहण काळात स्वयंपाक किंवा खाणं टाळा. गर्भवती महिलांनी या काळात तीक्ष्ण वस्तू वापरणं टाळलं पाहिजे. कारण याचा गर्भातील बाळावर हानिकारक परिणाम होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nauvari Saree Blouse Patterns: नऊवारी साडीवर उठून दिसतील हे 8 ट्रेंडिंग ब्लाउज पॅटर्न; गुढीपाडव्याला तुमच्यावर खिळतील लोकांच्या नजरा

Coconut Water: गोड पाणी असणारा नारळ कसा ओळखायचा? वाचा १ सोपी ट्रिक

Saturday Horoscope : शब्द खरा ठरणार, आर्थिक फायदा होणार; ५ राशींच्या लोकांचे आयुष्य बदलणार

जगात अणुबॉम्बची भीती, भारताकडे संजीवनी; रेडिएशनवर भारताचा रामबाण उपाय

‘AI फॉर एज्युकेशन’, १० लाखाहून अधिक मुलांचे शिक्षण होईल ए वन; संपर्क फाउंडेशनची राज्यात ४२ कोटींची गुंतवणूक

SCROLL FOR NEXT