Facts About Soap Foam
Facts About Soap Foam Saam Tv
लाईफस्टाईल

Facts About Soap Foam: साबणाचे रंग वेगळे पण, फेस सफेदच का ? जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Why Soap Foam Is White : शरीराची काळजी घेण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उत्पादने वापरत असतो. परंतु, रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या वेळी आपण सुंगधित अशा साबणाची निवड करतो. अगदी कपडे धुण्यापासून ते आंघोळीच्या साबणापर्यंत आपण विविध साबणाची निवड करतो.

आपल्या घरात (Home) विविधरंगी साबण असले तरी त्यातून निघणारा फेस हा सफेदचा का असतो ? शॅम्पू, फेस वॉश आणि हँडवॉशचा फोमही पांढरा असतो. आज आम्ही तुम्हाला त्यामागील काही गोष्टी समजावून सांगणार आहोत. चला जाणून घेऊया रंगीत साबणातून फक्त पांढरा फेस का येतो.

1. पांढरा फेस का बाहेर येतो?

पांढऱ्या फेसबाबत सायन्स (Science) सांगते की, कोणत्याही गोष्टीला स्वतःचा रंग नसतो, कोणतीही गोष्ट रंगीबेरंगी दिसण्यामागे प्रकाश किरण असतात. म्हणजेच एखादी वस्तू ज्या प्रकारे प्रकाशकिरण शोषून घेते, त्याचा रंगही तसाच दिसतो. ज्याप्रमाणे एखादी वस्तू प्रकाशाची सर्व किरणे शोषून घेतल्यास ती काळी दिसते, त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूने प्रकाशाची सर्व किरणे परावर्तित केली तर ती वस्तू पांढरी दिसते.

फोमवरील अथेन्स सायन्सचा अहवाल सांगतो की, साबण कोणत्याही रंगाचा असू शकतो, जेव्हा त्यातून फेस बाहेर येतो तेव्हा त्यात हवा, पाणी (Water) आणि साबण असतात जे एकत्रितपणे बुडबुडे बनवतात. जेव्हा सूर्याची किरणे या बुडबुड्यांवर पडतात तेव्हा ते परावर्तित होऊन पांढरे दिसतात.

2. कधीकधी बुडबुडे अनेक रंगांमध्ये देखील दिसतात

तुमच्या लक्षात आले असेल की, कपडे धुताना तयार होणाऱ्या मोठ्या बुडबुड्यांच्या बाहेरील थरावर अनेक रंग दिसतात, पण ते खूप जवळून दिसतात, हे बुडबुडे दुरूनही पांढरे दिसतात. हे सर्व सूर्यप्रकाशामुळे घडत असते. तर दुसरीकडे, हे आंघोळीच्या साबणाचा फेस हा आहे तसा दिसत असतो. याचे कारण म्हणजे त्यात मेण असते, जे साबणात मोठे बुडबुडे तयार होऊ देत नाही, आणि आंघोळीच्या साबणाचा साबणही घनदाट असतो, ज्यामुळे तो फक्त पांढरा दिसतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, एप्रिल महिन्याच्या शेवटचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

SCROLL FOR NEXT