आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा, अनेक सरकारी कार्यालयं आंदोलकांच्या ताब्यात

Mass Uprising In Iran: इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्ताविरोधी आंदोलनानं आता रौद्र रूप धारण केलय. आंदोलकानी सरकारी कार्यालयांवर कब्जा करण्यास सुरुवात केलीय. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे खोमेनी सरकारनं देशाची हवाई हद्द बंद केलीय.
Protesters gather on the streets of Tehran as Iran witnesses widespread anti-government unrest.
Protesters gather on the streets of Tehran as Iran witnesses widespread anti-government unrest.Saam Tv
Published On

गेल्या काही दिवसांपासून इराणमध्ये अक्षरशः रान पेटलंय. राजधानी तेहरानसह संपूर्ण देश सध्या धगधगत असून, आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये भीषण चकमकी सुरूनआहेत. परिस्थिती इतकी गंभीर बनलीय की, खामेनी सरकारनं संपूर्ण देशाची हवाई हद्दच बंद केलीय. तेहरानचं मुख्य विमानतळही ठप्प करण्यात आलाय. इराणमधील बडे नेते रेझा पहलवी यांनी केलेल्या आवाहनानंतर हे आंदोलन अधिक तीव्र झालय. आंदोलक रस्त्यावर उतरून ही शेवटची लढाई आहे, पहलवी परतणार अशा घोषणा देत आहेत.

जनतेचा हा वाढता आक्रोश पाहून सरकार प्रचंड दबावाखाली आहे. आंदोलकांनी तेहरान ताब्यात घेण्यास सुरुवात केलीय, सरकारी कार्यालये फोडली जाताहेत. तेहरानचे मुख्य रस्ते बंद करण्यात आले असून अमेरिका हल्ला करण्याची शक्यताही वाढलीय.

का घाबरलं खोमेनी सरकार?

वाढती महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून इराणच्या जनतेत प्रचंड रोष आहे. त्यामुळेच इराणमध्ये जागोजागी आंदोलनं सुरू आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून इराण सरकारनं सुरक्षेचं अत्यंत कडक पाऊल उचललय. देशातील एअर डिफेन्स सिस्टम सक्रिय करण्यात आलीय. इंटरनेटवर बंदी घालण्यात आली असून, कोणत्याही प्रकारच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सुरक्षा दलांचा मोठा ताफा तैनात करण्यात आलाय. जाणकारांच्या मते, गेल्या अनेक वर्षांतील हे इराणमधील सर्वात मोठे संकट आहे.

इराणमधील या हिंसक वळणावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत कडक भूमिका घेतलीय. इराणमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्याची हत्या करण्यात आली, तर अमेरिका गप्प बसणार नाही आणि याचं चोख प्रत्युत्तर दिले जाईलअसा इशारा ट्रम्प यांनी दिलाय. त्यामुळे कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला करू शकते. इराणमध्ये पेटलेलं हे जनआंदोलन आता कोणत्या वळणावर येतं हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com