Brain shrinking saam tv
लाईफस्टाईल

Brain shrinking: कमी पाणी पिणाऱ्यांचा मेंदू होतोय हळूहळू छोटा; नव्या अभ्यासातून धक्कादायक बाब समोर

Dehydration effects on brain: नव्या संशोधनानुसार जे लोक नियमितपणे कमी पाणी पितात त्यांच्या मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतो. अभ्यासात असे आढळले आहे की, शरीरात पाण्याची कमतरता दीर्घकाळ राहिल्यास मेंदूतील पेशींचे कार्य मंदावते आणि हळूहळू मेंदू आकुंचन पावतो.

Surabhi Jayashree Jagdish

पाणी पिणं हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असतं. अगदी थंडीच्या दिवसात देखील तज्ज्ञ पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहितीये कमी पाणी प्यायल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या मेंदूवर होतो. एका अभ्यासानुसार, कमी पाणी पिणं हे तुमची एकाग्रातेवर परिणाम करतं. तसंच तुमचा मेंदूचा आकार कमी होऊन तो हळू काम करू लागतो.

नव्या अभ्यासातून काय आलं समोर?

कमी पाणी प्यायल्यामुळे मेंदूवर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे एकाग्रता कमी होते आणि स्मरणशक्तीवरही परिणाम होऊ शकतो. एका अभ्यासानुसार, कमी पाणी प्यायल्यामुळे डिहायड्रेशन झाल्यास त्यामुळे लक्ष केंद्रित करणं आणि स्मरणशक्तीशी संबंधित समस्या होतात. याशिवाय मेंदूचा आकार कमी होऊन तो २० टक्के हळू काम करत असल्याचं ही समोर आलंय.

काय आहे यामागे कारण?

मेंदूचा सुमारे ७५ ते ८५ टक्के भाग पाण्याने बनलेला असतो. त्यामुळे मेंदूला चांगलं काम करण्यासाठी सतत पाण्याची गरज असते. हे पाणी हार्मोन्स आणि न्यूरोट्रान्समीटर तयार करण्यात मदत करतं.

हायड्रेशन का महत्त्वाचं?

  • मेंदूतील पेशी योग्य पद्धतीने काम करतात

  • लक्ष केंद्रित ठेवण्यास आणि विचार स्पष्ट ठेवण्यास मदत होते

  • ऊर्जा वाढते

  • थकवा कमी होतो.

  • निर्णय घेण्याची क्षमता सुधारते.

पाणी कमी पिण्याचे मेंदूवरील परिणाम:

स्मरणशक्तीवर परिणाम

पाणी कमी प्यायल्याने गोष्टी आठवणं, निष्कर्ष काढणं आणि नवीन आठवणी तयार करणं कठीण होतं. अगदी कमी प्रमाणाताली डिहायड्रेशन सुद्धा स्मरणशक्तीवर परिणाम करू शकतं.

एकाग्रतेत घट

जर तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रा असेल तर मेंदू थकलेला वाटतो. ज्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण होतं.

थकवा

पाणी कमी प्यायल्याने स्नायूंना आणि मेंदूला ऊर्जा मिळणे कमी होतं. ज्यामुळे दिवसभर सुस्ती आणि थकवा जाणवू शकते.

मेंदूच्या पेशींचे आकुंचन

दीर्घकाळ डिहायड्रेशन राहिल्यास मेंदूच्या पेशींचा आकार कमी होऊ लागतो. ही परिस्थिती नंतर गंभीर बनू शकते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी लातूरमध्ये टाकला मोठा डाव, 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश

चालत्या फिरत्या माणसाला हृदयविकाराचा झटका; अवघ्या काही सेकंदात जीव गेला

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

America Target Iran: व्हेनेझुएलानंतर अमेरिकेच्या निशाण्यावर इराण; इराणमध्ये सत्तांतर होणार ?

भाजपनं शिंदेसेनेला डिवचलं, प्रचारात '50 खोके, एकदम ओके'च्या घोषणा

SCROLL FOR NEXT