Chanakya Niti Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Relationship: पती-पत्नीच्या वयातील अंतर वाढवू शकते नात्यातील दूरावा, चाणक्यांनी दिला नातं टिकवण्याचा सल्ला

Relationship Tips : आचार्य चाणक्य खूप बुद्धिमान होते, लोक त्यांच्या जीवनात अनेक गोष्टींचा अवलंब करून यशस्वी झाले आहेत.

कोमल दामुद्रे

Chanakya Niti On Relationship: आचार्य चाणक्य हे भारतीय राजा चंद्रगुप्त मौर्य यांचे सल्लागार होते. आचार्य चाणक्य खूप बुद्धिमान होते, लोक त्यांच्या जीवनात अनेक गोष्टींचा अवलंब करून यशस्वी झाले आहेत. ते एक चांगले तत्वज्ञानी, शिक्षक, अर्थशास्त्रज्ञ आणि लेखक देखील होते.

चाणक्यांची अनेक धोरणे आहेत ज्याचा अवलंब करून व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते. आचार्य चाणक्यांनी पती-पत्नीचे संबंध चांगले ठेवण्यासाठी केवळ यशच नाही तर उपाय देखील सांगितले आहेत. चला तर मग जाणून घेऊया चाणक्यानुसार यशस्वी वैवाहिक (Marriage) जीवनासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत

1. पती-पत्नीच्या वयातील फरक

पती-पत्नीच्या नात्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगले असणे खूप महत्त्वाचे आहे. शारीरिक इच्छांच्या पूर्ततेसाठी दोघांमध्ये वयाचा फरक नसावा. पती-पत्नीच्या वयात मोठा फरक असेल तर नात्यात (Relationship) अडचणी निर्माण होतात. चाणक्याच्या मते, पती-पत्नीमध्ये वयाचा अधिक फरक विषासारखा आहे. जर एखाद्या वृद्ध पुरुषाने तरुण स्त्रीशी लग्न केले तर ती स्त्री दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होऊ शकते. त्यामुळे संबंध बिघडू शकतात.

2. एकमेकांचा आदर करणे

चाणक्य नीतीनुसार वैवाहिक जीवनात सुखासाठी दोघांनीही एकमेकांचा पूर्ण आदर केला पाहिजे. पती-पत्नी दोघांनीही एकमेकांबद्दल पूर्ण आदर राखला पाहिजे. जर त्यांनी एकमेकांचा आदर केला नाही तर नात्यात मतभेद निर्माण होऊन तणाव (Stress) निर्माण होतो. अशा परिस्थितीत हे नाते फार काळ टिकत नाही.

3. गरजा समजून घेणे

पती-पत्नीने एकमेकांच्या सर्व गरजा समजून घेतल्या पाहिजेत. याने दोघांमध्ये चांगले संबंध टिकून राहतात. दोघांना एकमेकांच्या गरजा समजल्या नाहीत तर आयुष्यात अनेक अडचणी येतात. अशा परिस्थितीत दोघांमधील प्रेम कमी होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : नगराध्यक्षांपाठोपाठ आता नगरसेवकांचेही ठरले; काहींचे गणित जमले तर काहींचे बिघडले

Maharashtra Live News Update: नागपुरात सकल ओबीसी समाजाचा उद्या महामोर्चा निघणार

दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा भाव किती? पहा लेटेस्ट दर

Ashok Mama : भैरवीच्या स्वप्नांना मिळणार अशोक मामांची खंबीर साथ; मालिका घेणार नवीन वळण, पाहा VIDEO

Shocking News : संतापजनक! खेळताना बॉल दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेला, संतापलेल्या सुरक्षारक्षकाकडून मुलांना बांधून मारहाण

SCROLL FOR NEXT