whatsApp  yandex
लाईफस्टाईल

Tech News: व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करताना कॅबही करता येणार बूक; WhatsApp चे भन्नाट फिचर्स

WhatsApp Features: तुमच्याकडील व्हॉट्सअप आता खूप भन्नाट झालंय. जर तुमच्याकडे Uber अ‍ॅप इन्स्टॉल केलेले नसले तरीही तुम्ही या मेसेजिंग अ‍ॅपने कॅब बूक करू शकतात. Uber आणि WhatsAppने भागीदारी केली असून त्यांच्या या डीलमुळे व्हॉट्सअप युझर्स चॅट करताना कॅबही बूक करू शकतील.

Bharat Jadhav

WhatsApp New Services :

WhatsApp हे सर्वात लोकप्रिय चॅट अ‍ॅप आहे. कंपनी या मेसेजिंग अ‍ॅपद्वारे नफा वाढवण्याच्या प्रयत्न करत आहे. या मेसेजिंग प्लॅटफॉर्ममधून पेमेंट्स, ईकॉमर्ससह इतर सेवांमध्ये विस्तार करण्याचा प्रयत्न करीत आहे. तुम्ही घर किंवा ऑफिसमधून बाहेर पडताना WhatsApp द्वारे दिल्ली मेट्रोचे तिकीट बुक करू शकतात. इतकेच नाहीतर व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने तुम्ही किराणा सामानाची ऑर्डर देऊ शकता. मित्र आणि कुटुंबियांशी चॅट करण्यापलीकडे तुम्ही WhatsApp वरून कोणत्या ६ उपयुक्त गोष्टी करू शकता हे जाणून घेऊ. (Latest News)

कॅब बूक करा

तुमच्याकडे Uber अ‍ॅप इन्स्टॉल केलेले नसले तरीही, WhatsApp द्वारे सहजपणे कॅब बुक करू शकता. पत्ता किंवा पिन टाईप न करता तुम्ही तुमचे रिअल-टाइमवरील लोकेशन Uber ला पाठवून तुम्ही तुमचे अचून पिकअप ठिकाण सेट करू शकता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मेट्रो तिकीट बुक करू शकता

शहरी भारतात सार्वजनिक वाहतूक अत्यंत लोकप्रिय आहे, परंतु टोकन किंवा रिचार्ज कार्डसाठी रांगा खूप लांब असतात. हे अडचण दूर करण्यासाठी व्हॉट्सअपने नवीन फिचर आणलंय. याद्वारे तुम्ही मेट्रोचं तिकीट काढू शकता. यामुळे रांगेत उभे राहण्याचं टेन्शन कमी होणार आहे.

JioMart च्या मदतीने खरेदी

व्हॉट्सअ‍ॅपच्या मदतीने तुम्ही किराणा वस्तूंची ऑर्डर देऊ शकता. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर JioMart वर वस्तूंची ऑडर द्यावी लागेल. JioMart वर तुम्ही वस्तूंची यादी तयार करू शकता. तुम्ही व्हर्च्युअल कार्टमध्ये आयटम सेव्ह करू शकता आणि WhatsApp Pay सह मिळवू शकता.

डिजी लॉकरचा फायदा

प्रवासाला जात असताना तुम्हाला तुमच्या कारची कागदपत्रे सोबत ठेवावी लागतात. पण त्यासाठी एक मोठी फाईलसोबत ठेवावी लागते. वाचकांनो तुम्हाला माहितीये व्हॉट्सअपच्या नव्या फिचरमुळे फाईल बाळगण्याचं टेन्शन कमी होणार आहे. कारण व्हॉट्सअप आता पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स यासारख्या महत्त्वाच्या क्रेडेंशियल्स कागदपत्रे डिजीलॉकरची सुविधा देणार आहे. भारत सरकारच्या डिजीलॉकरमध्ये हे कागदपत्रे ठेवता येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT