CNG Cars:  Saam tv
लाईफस्टाईल

Tata Motors: देशातील बाजारपेठेत सीएनजी कारचा दबदबा, ईव्‍ही क्रांतीदरम्‍यान टाटा मोटर्सने केला महत्वाच्या धोरणाचा अवलंब

tata motors CNG Car News: टाटा मोटर्स या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने सीएनजी वाहनांसाठी मोठं पाऊल उचललं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

tata motors CNG Car News:

गेल्‍या तीन ते चार वर्षांमध्‍ये सीएनजी कार्सना अधिक पसंती मिळत आहे. भारतीय बाजारपेठेत सीएनजी कार मॉडेल्‍सला मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्स या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने सीएनजी वाहनांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. (Latest Marathi News)

देशभरातील बाजारपेठेत सीएनजी कारची मागणी वाढताना दिसत आहे. देशभरातील या वाढीसाठी सीएनजी रिफ्युलिंग स्टेशन्सचा प्रसार गेम चेंजर ठरला आहे. तीन वर्षांपूर्वी जवळपास १,५०० स्‍टेशन्‍स होते. आज ही आकडेवारी जवळपास ५,५०० स्‍टेशन्‍सपर्यंत पोहोचली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उल्‍लेखनीय बाब म्‍हणजे, हरियाणा, दिल्‍ली, गुजरात व महाराष्‍ट्र यांसारख्‍या राज्‍यांनी सीएनजी वाहनांचा अवलंब केला आहे. ज्‍यामुळे या प्रदेशांमध्‍ये बाजारपेठेतील सीएनजी वाहनांचे प्रमाण वाढले आहे. गेल्‍या वर्षी बाजारपेठेत ४ लाख सीएनजी कार्सची विक्री झाल्याची माहिती मिळाली आहे. ज्‍यामध्‍ये टाटा मोटर्सच्‍या जवळपास ५०,००० युनिट्सचा समावेश होता, अशी माहिती हाती आली आहे.

सीएनजी कारच्या वाढत्या मागणीमुळे टाटा मोटर्सने मल्‍टी-पॉवरट्रेन धोरणाचा अवलंब केला आहे. या धोरणातंर्गत सीएएफई नियमांचे पालन केले जाणार असल्याची माहिती मिळतेय. तसेच टाटा मोटार्स कंपनीने त्यांच्या टिगोर आणि टियागो मॉडेल्‍ससाठी अगोदरच सीएनजी पर्याय सादर केले आहेत.

त्याचबरोबर अल्‍ट्रोज आयसीएनजीच्या सादरीकरणामुळे प्रीमियम हॅचबॅक विभागातील पोकळी दूर होत आहे. यामध्ये सुधारित सामान कक्षासाठी ट्विन-सिलिंडर तंत्रज्ञान, सनरूफ, वायरलेस चार्जर यांचा समावेश आहे.

सध्‍या भारतीय ऑटोमोटिव्‍ह उद्योगामध्‍ये सीएनजीचे प्रमाण १५ टक्‍के आहे. तरी या उद्योगाचे प्रमाण २० ते २५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढण्‍याची अपेक्षा आहे. टाटा मोटर्सकडून मल्‍टी-पॉवरट्रेन धोरण, वैविध्‍यपूर्ण सीएनजी मॉडेल्‍सची उपलब्‍धता करण्यात येत आहे. सध्‍या, दर महिन्‍याला जवळपास ५२,००० सीएनजी वाहनांची विक्री केली जाते. या विक्रीमध्‍ये अधिक योगदान खासगी कार खरेदीदारांचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: परळीत ५० हजार मतांनी धनंजय मुंडे आघाडीवर

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

IND vs AUS 1st Test: लाईव्ह सामन्यात हर्षित राणा अन् मिचेल स्टार्क भिडले! नेमकं काय घडलं? -VIDEO

SCROLL FOR NEXT