Tata Tiago EV Saam Tv
लाईफस्टाईल

Tata Tiago EV : टियागो ईव्हची यशस्वी घोडदौड! चार महिन्यात डिलिव्हरीचा दहा हजार टप्पा गाठणारी पहिली फास्टेस्ट कार

Tata Tiago EV Specification : १० हजार डिलिव्‍हरीचा चार महिन्‍यांच्‍या आत हा टप्‍पा गाठणारी फास्‍टेस्‍ट ईव्‍ही कार बनली आहे.

कोमल दामुद्रे

Tata Tiago EV Features : टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्‍या ऑटोमोबाइल उत्‍पादक कंपनीने टियागो.ईव्‍हीचा डिलिव्हरीचा टप्पा यशस्वीरित्या पार पडला आहे. १० हजार डिलिव्‍हरीचा चार महिन्‍यांच्‍या आत हा टप्‍पा गाठणारी फास्‍टेस्‍ट ईव्‍ही कार बनली आहे.

टियागो.ईव्‍ही फास्‍टेस्‍ट बुक्‍ड ईव्‍ही इन इंडिया बनल्‍यानंतर ही घोषणा करण्‍यात आली आहे, यात २४ तासांमध्‍ये १० हजार बुकिंग्‍जची आणि डिसेंबर २०२२ पर्यंत २० हजार बुकिंग्‍जची नोंद झाली आहे. जाणून घेऊया इतर गोष्टी

टाटा (Tata) पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.च्‍या विपणन, विक्री व सेवा धोरणाचे प्रमुख श्री. विवेक श्रीवत्‍स म्‍हणाले, टियागो.ईव्‍ही लाँच झाल्‍यापासून उल्‍लेखनीय टप्‍पे पार करत आहे. फास्‍टेस्‍ट बुक्‍ड ईव्‍ही इन इंडियापासून भारतातील (India) सर्वात गतीशील ईव्‍ही बनण्यापर्यंत ते १० हजार डिलिव्‍हरीचा टप्‍पा गाठण्‍यापर्यंत या इलेक्ट्रिक हॅचने कोणतीच कसर सोडलेली नाही.

1. ड्रायव्हिंग अनुभव

टियागो.ईव्‍हीने यशस्‍वीरित्‍या ४९१ शहरांमध्‍ये प्रवेश केला आहे, ज्‍याअंतर्गत एकूण ११.२ दशलक्ष किमी प्रवास करण्‍यात आला असून वातावरणात १.६ दशलक्ष ग्रॅम कार्बन डायऑक्‍साईड उत्‍सर्जित होण्‍यास प्रतिबंध झाला आहे. टियागो.ईव्‍ही प्रिमिअम-नेस, सुरक्षितता व तंत्रज्ञान वैशिष्‍ट्ये आणि इको-फ्रेण्‍डली उपस्थिती देणारी सेगमेंट डिस्रप्टर बनण्‍यासह धमाल इलेक्ट्रिक ट्रेण्‍डसेटर देखील आहे, जी वापरकर्त्‍यांना उच्‍च दर्जाचा ड्रायव्हिंग अनुभव देते.

2. कसा असेल प्रवास

१२०० हून अधिक टियागो.ईव्‍हींनी ३००० किमीहून अधिक अंतरापर्यंत प्रवास केला आहे आणि ६०० हून अधिक कार्सनी भारतीय रस्‍त्‍यांवर प्रत्‍येकी ४००० किमीहून अधिक अंतर प्रवास केला आहे. ज्‍यामधून उत्‍पादनाची उच्‍च क्षमता प्रबळपणे दिसून येते. तसेच मालकीहक्‍काचा कमी खर्च संपूर्ण पॅकेजमध्‍ये अतिरिक्‍त फायद्याची भर करतो. घरामध्‍ये जवळपास ९० टक्‍के चार्जिंग होण्‍यासह सर्व ग्राहकांनी आयसीई कार्सच्यारनिंग खर्चाच्‍या तुलनेत एकत्र ७ कोटी रूपयांहून अधिक बचत केली आहे.

3. फीचर्स (Features)

  • हाय-व्‍होल्‍टेज अत्‍याधुनिक झिप्‍ट्रॉन तंत्रज्ञानावर आधरित टियागो.ईव्‍ही कार्यक्षमता, तंत्रज्ञान, विश्‍वसनीयता, चार्जिंग व आरामदायीपणा या ५ प्रमुख आधारस्‍तंभांवर प्रबळ आहे.

  • ही कार मल्‍टी-मोड रिजेन व दोन ड्राइव्‍ह मोड्स - सिटी व स्‍पोर्ट सह डिजिटल ड्राइव्‍ह, अद्वितीय सानुकूल ड्रायव्हिंग अनुभव देते.

  • टियागो.ईव्‍ही आयपी६७ प्रमाणित बॅटरी पॅक्‍स (जल व धूळ रोधक) आणि चार्जिंग पर्यायांच्‍या विविध संयोजनांमध्‍ये सादर करण्‍यात आली आहे.

  • या कारमध्‍ये दैनंदिन लांबच्‍या प्रवासासाठी ३१५ किमीची मोडिफाइड इंडियन ड्रायव्हिंग सायकल (एमआयडीसी) रेंज देणारा २४ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅक आणि लहान व वारंवार ट्रिप्‍ससाठी २५० किमीची अंदाजे एमआयडीसी रेंज देणारा १९.२ केडब्‍ल्‍यूएच बॅटरी पॅक आहे.

  • सर्व त्रासांना दूर करत लिक्विड कूल्‍ड बॅटरी व मोटर ८ वर्ष किंवा १६०,००० किमी वॉरंटीसह येतात.

4. चार्जिंग पर्याय

  • कुठेही, कधीही विनासायास चार्जिंगसाठी १५ अॅम्पियर प्‍लग पॉइण्‍ट देण्यात आले आहे.

  • तसेच प्रमाणित ३.३ केडब्‍ल्‍यू एसी चार्जर

  • ७.२ केडब्‍ल्‍यू एसी होम फास्‍ट चार्जर, जो फक्‍त ३० मिनिटांच्‍या चार्जिंगमध्‍ये ३५ किमी अंतरापर्यंत प्रवासाची खात्री देऊ शकतो.

  • तसेच ३ तास ३६ मिनिटांमध्‍ये वेईकलची संपूर्ण चार्जिंग (१० टक्‍क्‍यांपासून १०० टक्क्यांपर्यंत) होऊ शकते.

  • डीसी फास्‍ट चार्जिंग, जे फक्‍त ३० मिनिटांच्‍या चार्जिंगमध्‍ये ११० किंमी अंतरापर्यंत प्रवासाची खात्री देऊ शकते आणि फक्‍त ५७ मिनिटांमध्‍ये वेईकलला १० टक्‍के ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत चार्ज करू शकते.

5. वैशिष्ट्ये

  • टियागो.ईव्‍ही ही सर्व ट्रिम्‍समध्‍ये टेलिमॅटिक्‍स देणारी तिच्‍या श्रेणीतील पहिली कार असेल.

  • झेडकनेक्‍ट अ‍ॅप ४५ कनेक्‍टेड कार वैशिष्‍ट्ये देईल, जसे रिमोट एसी ऑन/ऑफ सह टेम्परेचर सेटिंग, रिमोट जिओ फेन्सिंग व कार लोकेशन ट्रॅकिंग, स्‍मार्ट वॉच कनेक्टीव्हीटी, रिमोट वेईकल हेल्‍थ डायग्‍नोस्टिक्‍स, रिअल-टाइम चार्ज स्‍टेटस, डायनॅमिक चार्जर लोकेटर, ड्रायव्हिंग स्‍टाइल अ‍ॅनालिटिक्‍स व इतर.

  • या वैशिष्‍ट्यांव्‍यतिरिक्‍त ग्राहकांना ८-स्‍पीकर हर्मन इन्‍फोटेन्‍मेंट सिस्‍टमसह अँड्रॉईड ऑटो व अ‍ॅप्‍पल कार प्‍ले कनेक्‍टीव्‍हीटीचा देखील आनंद घेता येईल. या कारची अधिक सविस्तर माहीती ही आपल्याला Tiagoev.tatamotors.com मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: Mumbai: दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असलेल्या तरुणाला अटक

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

उत्तर प्रदेशसह 5 राज्यांच्या निवडणुका कधी होणार? तारखांबाबत मोठी अपडेट

राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार की नाही? सुनेत्रा पवारांसोबतच्या भेटीवर CM फडणवीसांचा मोठा खुलासा!

Sunday Horoscope: आज ग्रहांची स्थिती बदलणार; कोणाला फायदा, कोणाला सावध राहण्याचा सल्ला? वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT