Car Cleaning Tips : गाडी घेतल्यानंतर आपण त्याच्या सर्व्हिंसिंगकडे अधिक लक्ष देत नाही. गाडी स्वच्छ करण्यासाठी आपण बरेचदा वरच्यावर किंवा घरीच्या घरी त्याची साफसफाई करतो. हल्ली बाजारात कारच्या दुरुस्तीपासून ते साफसफाईपर्यंत अनेक गोष्टी सहज उपलब्ध होतात.
अनेकदा पैसे (Money) वाचवण्यासाठी आपण घरच्या घरी कार धुण्याचा प्रयत्न करतो. परंतु, कार घरी धुणे तितके सोपे नसते. वॉश करताना एखादी छोटीशी चूकही तुमच्या नवीन कारवर ओरखडे आणि डाग आणू शकते. अशावेळी आज आम्ही तुम्हाला त्या सामान्य चुकांबद्दल सांगणार आहोत, ज्यांमुळे कारची चमक कमी होते.
अनेकांना असे वाटते की, कार धुताना डिटर्जंट किंवा साबण उपयुक्त आहे. परंतु, याचा वापर केल्याने गाडी खराब होते. म्हणून त्याचा अतिरिक्त वापर करणे टाळावे. यासाठी तुम्ही केसांचा शैम्पू आणि कंडिशनर वापरू शकता. परंतु, तोही कमी वेळासाठी. याशिवाय तुम्ही कारसाठी खास डिझाइन केलेले शैम्पू देखील खरेदी करू शकता.
बहुतेक लोक कार धुताना एकाच बादलीत साबण आणि पाणी वापरण्याची चूक करतात. कार धुण्यासाठी एका बादलीत स्वच्छ पाणी व दुसऱ्या बादलीत साबण घेऊन कार साफ करावी. यामुळे साबणचे किंवा शॉम्पूचे डाग दिसत नाही. तसेच कारची चमक देखील वाढते.
अनेकदा पक्षी आपल्या कारवर घाण करतात त्यासाठी आपण ते लगेच साफ करायला हवे. कारण ते कोरडे झाल्यावर लगेच निघत नाही व त्यासाठी त्याला अधिक जोर लावून घासावे लागते. त्यामुळे गाडीला स्क्रॅच येऊ शकतात. त्यामुळे ते काढून टाकण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ल्युब किंवा ओलसर कापड वापरा.
घरांमध्ये, जुन्या टॉवेल आणि टी-शर्टचा वापर साफसफाईसाठी केला जातो. काही लोक याचा वापर कार स्वच्छ करण्यासाठीही करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, यामुळे तुमच्या कारची चमकही कमी होऊ शकते. कार स्वच्छ करण्यासाठी नेहमी मऊ कापड वापरावे. जर तुम्हाला कार घरी पॉलिश करायची असेल, तर त्यासाठी योग्य साफसफाई करा.
कार योग्य क्रमाने धुणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा गाडी नीट साफ केली जात नाही. यासोबतच ओरखडे पडण्याचाही धोका असतो.अशा परिस्थितीत जर तुम्ही घरीच गाडी धुत असाल तर आधी त्याचे टायर आणि नंतर शरीर स्वच्छ करा. असे केल्याने टायरमध्ये अडकलेली वाळू आणि चिखल उडून गाडीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे गाडी पुन्हा साफ करण्याची गरज नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.