Gas Burner Cleaning Hacks
Gas Burner Cleaning HacksSaam Tv

Gas Burner Cleaning Hacks : चिवट बर्नर काही मिनिटांमध्ये होईल साफ, फक्त 'या' दोन गोष्टी वापरून पहा

Gas Burner Cleaning : बर्नरचे होल ब्लॉक होतात आणि ज्यामुळे बर्नरमधुन खूप कमी प्रमाणात आग येते.

Kitchen Tips : प्रत्येक भारतीत व्यक्तीच्या घरातील सगळ्यात महत्त्वाचे उपकरण म्हणजे गॅस. गॅस शिवाय आपण जेवणाचा एक कण सुद्धा बनवू शकत नाही. जेवण बनवताना अनेकवेळा गॅसच्या बर्नरवर तेल किंवा ग्रेव्ही सांडते. त्यामुळे बर्नरचे होल ब्लॉक होतात आणि ज्यामुळे बर्नरमधुन खूप कमी प्रमाणात आग येते.

जर हे बर्नर पूर्णपणे खराब झाले तर यामधून आग येणे पूर्णपणे बंद होउन जाते. अशातच गॅस (Gas) बर्नर साफ करणे अत्यंत गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला गॅस बर्नर साफ करण्याचे दोन सिंपल नुस्खे सांगणार आहोत. असं केल्याने तुमच्या गॅस शेगडीचा बर्नर चमकेल. सोबतच नवीन दिसेल आणि सुंदर दिसेल.

Gas Burner Cleaning Hacks
Kitchen Hacks : फ्रीजचा वापर न करता टोमॅटोला अशाप्रकारे करा स्टोर, राहातील एकदम फ्रेश !

1. गरम पाणी लिंबू आणि इनो :

लिंबू हा घरामधील (Home) भांद्यांवरचे डाग साफ करण्यासाठी उत्तम उपाय आहे. अशातच या दिवसांमध्ये देखील लिंबूने भांडी घसल्यावर भांडी अगदी चमकून निघतात. साठी सर्वात आधी भांड्यामध्ये गरम पाणी घ्या. त्यानंतर यामध्ये लिंबूचा रस पिळून इनो टाका. आता या पाण्यामध्ये बर्नरला कमीत कमी दोन तास भिजत ठेवा. आता दोन तासानंतर बर्नर पाण्यामधून बाहेर काढून डिश वॉशने धुवा. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मेटल स्क्रबचा वापर देखील करू शकता. आता बर्नरला सुकवा आणि त्याचा वापर करा.

Gas Burner Cleaning Hacks
Gas Burner Cleaning HacksCanva

2. पाणी आणि विनेगर :

बर्नरला विनेगरने साफ करणे हा सुद्धा एक उत्तम उपाय आहे. यासाठी एका भांड्यामध्ये पाणी (Water) आणि विनेगर मिसळावा. त्यानंतर यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करून बर्नरला एक ते दोन तास भिजत ठेवा. दोन तासांनी बाहेर काढल्यावर साबणाच्या सहाय्याने भरणारे चांगले घासून घ्या.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com