Tata Upcoming Electric Car: वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स लवकरच आपली नवीन इलेक्ट्रिक कॉम्पॅक्ट कार भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. कंपनीची ही कार दिसायला खूपच आकर्षक आहे. तुम्ही ही कार पाहताच प्रेमात पडाल. यामध्ये कंपनीने अनेक जबरदस्त फीचर्स दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्सने आपल्या प्रसिद्ध एसयूव्ही टाटा हॅरियरचे इलेक्ट्रिक व्हर्जनचे अनावरण केले आहे. कंपनीने सोशल मीडियावर या एसयूव्हीचा फोटो पोस्ट केला आहे.
टाटा मोटर्सने मागील ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये (Auto Expo 2023) हॅरियर ईव्ही कॉम्पॅक्ट जगासमोर आणली. आता ही एसयूव्ही नव्या रंगात आणि स्टाईलमध्ये सादर करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
कंपनीचे म्हणणे आहे की, ही एसयूव्ही पुढील वर्षभरात बाजारात दाखल होईल आणि प्रत्येकाला ती चालवण्याचा आनंद घेता येईल. असे बोलले जाये आहे की, कंपनीने सोशल मीडियावर याचे फोटो पोस्ट केले आहे, जेणेकरुन युजर्सची प्रतिक्रिया जाणून घेता येतील. (Latest Auto News in Marathi)
हॅरियर ईव्हीच्या (Tata Harrier EV) लॉन्चच्या वेळी टाटा मोटर्सने सांगितलं आहे की, ही ऑल-व्हील ड्राइव्ह कॉन्फिगरेशनसह ड्युअल इलेक्ट्रिक मोटर सेटअपसह सुसज्ज असेल. असेही सांगण्यात आले की, इलेक्ट्रिक एसयूव्ही कार-टू-लोड (V2L) आणि कार-टू-कार(V2V) चार्जिंग सुविधेसह सुसज्ज असेल.
एका चार्जमध्ये गाठणार मुंबई-पुणे-मुंबई
टाटा मोटर्सने अद्याप या कराचे फीचर्स उघड केलेली नाहीत. परंतु असे बोलले जाते की, ही एसयूव्ही सुमारे 400 ते 500 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. याची थेट स्पर्धा महिंद्रा XUV700 इलेक्ट्रिकशी होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.