Tan Removal Cream Saam TV
लाईफस्टाईल

Tan Removal Cream : स्किनवरील टॅन 2 मिनिटांत होईल गायब; घरीच ट्राय करा 'हा' जबरदस्त उपाय

Tan Removal Cream For Body : त्वचेवरील टॅन काढून टाकण्यासाठी तुम्ही घरगुती काही सिंपल टिप्सचा वापर करू शकता. या टिप्सने तुमच्या चेहऱ्यावरील आणि स्किनवरील सर्व टॅन गायब होईल.

Ruchika Jadhav

पावसाळा संपत आला असून आता हिवाळ्याला सुरुवात होणार आहे. गुलाबी थंडीची सर्वजण वाट पाहत आहेत. मात्र मुंबई म्हटल्यावर येथे हिवाळा ऋतूच नसतो असं काहीजण सांगतात. अशात मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढली आहे. गरम होत असल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. उन्हात प्रवास केल्याने आपल्या चेहऱ्यावर आणि शरीरावर टॅन येण्यास सुरुवात होते.

तरुण मुली आणि महिला उन्हामुळे स्किन टॅन होऊ नये म्हणून विविध प्रोडक्ट आणि सनस्क्रीन लोषण वापरतात. मात्र तरीही स्किन टॅन होते आणि काळी पडते. त्यामुळेच यापासून वाचण्यासाठी आम्ही एक रामबाण उपाय शोधला आहे. घरच्याघरी हा उपाय ट्राय केल्याने तुमच्या चेहऱ्यावर आणि त्वचेवर असलेलं टॅन मिनिटांत गायब होईल.

साहित्य

बीट

मिल्क पावडर

तांदळाचे पीठ

कृती

सर्वात आधी बीट उकडवून घ्या. त्यानंतर हे बीट मिक्सरला बारीक करून घ्या. पुढे एका सूती कापडात सर्व मिश्रण गाळून घ्या. त्यानंतर गाळून घेतलेल्या पाण्यात मिल्क पावडर आणि तांदळाचे पीठ मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण असेच आर्धातास सेट होऊ द्या.

काही वेळाने तुम्ही हातावर, चेहऱ्यावर आणि पायांवर ही पेस्ट लावू शकता. पेस्ट स्किनवर लावल्यानंतर 10 ते 20 मिनिटे स्किनवर असेच रहुद्या. त्यानंतर स्किनवरील पेस्ट पुसून घ्या. हा उपाय केल्यावर लगेचच तुम्हाला रिझल्ट दिसेल. तुमची त्वचा आधी पेक्षा जास्त ग्लो करेल. हा उपाय तुम्ही महिन्यातून 3 वेळा तरी करायला हवा. याने स्किन टॅन होण्यापासून वाचते तसेच त्वचेवरील चमक कायम राहते.

उन्हाने चेहरा खराब होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी

उन्हाने चेहरा खराब होऊ नये म्हणून योग्य ती काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी बाहेर पडताना चेहऱ्याला स्कार्फ बांधा. तसेच डोळ्यावर काळा गॉगल किंवा सनग्लास लावू शकता. ऊन जास्त असल्याने डोळ्यांवर देखील त्याचा परिणाम होतो त्यामुळे तुम्हाला डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.

बाहेर ऊन जास्त असताना आणखी एक काळजी घेतली पाहिजे. बाहेर पडताना कायम जवळ एक पाण्याची बॉटल ठेवा. उन्हामुळे डीहायड्रेशन सुद्धा होते. त्यामुळे कायम स्वतः जवळ एक पाण्याची बॉटल ठेवावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

Crime News: पुण्यात टोळी युद्धाचा भडका, आंदेकर विरुद्ध कोमकर गँगवॉरला सुरुवात

Asia Cup Hockey 2025 : टीम इंडियाने चौथ्यांदा कोरलं आशिया कपवर नाव; अंतिम फेरीत दक्षिण कोरियाला धूळ चारली

SCROLL FOR NEXT