ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घट्ट चप्पलेने पायांवर काळपटपणा येऊ लागतो. मग टॅन होतं आणि सँडल घातल्यावर ते घाणेरडे दिसतात.
अनेक वेळा महिला पायातील काळेपणा दूर करण्यासाठी पेडीक्योरचा वापर करतात. त्यासाठी खूप पैसे खर्च होतात पण त्याचा परिणाम एकाच वेळी दिसत नाही.
पायातील काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही दोन घरगुती गोष्टी वापरू शकता. यामुळे तुमचे पाय चमकदार होतील.
त्वचेचा रंग उजळ करायला बेसन आणि दही खूप फायदेशीर असतं. याने डेड स्किन निघून जाते आणि त्वचेचा काळेपणा दूर होतो.
२चमचे बेसन, २ चमचे दही, १/२ हळद, १/२ लिंबाचा रस या साहित्याचा वापर करुन पॅक तयार करु शकतो.
आता हा पॅक पायाला नीट लावा. ३० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून २-३ वेळा ते लावा.
नारळाचे तेल देखील त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करते. त्याने टॅनिंग कमी होते. तसच साखर त्वचेवर स्क्रबरचे काम करते.
२ चमचे खोबरेल तेलात १ चमचा बारिक साखर मिसळा. ते मिक्स करून स्क्रब तयार करा.
नंतर या पेस्टने तुमचे पाय स्क्रब करा. १५ मिनिटे राहू द्या. शेवटी कोमट पाण्याने ते स्वच्छ करा. आठवड्यातून २ ते ३ वेळा ते लावा.
हेल्थ-लाईफस्टाईल
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.