ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खोबरं खायला आवडतं.
अनेकजण खोबरं खाऊन झाल्यावर त्याची साल फेकून देतात.
पण तुम्हाला माहिती आहे का खोबऱ्याच्या सालीचे अनेक उपयोग आहेत.
या घरगुती कामांसाठी तुम्ही सालीचा उपयोग करू शकता.
तुम्ही नारळाच्या सालीचा उपयोग झाडांना खत बनवण्यासाठी करू शकता.
नारळाच्या भुस्यामध्ये हळद मिसळून जखमेवर लावल्यामुळे जखम लवकर बरी होते.
मातीच्या चुलीवर स्वयंपाक करताना नारळाच्या सालीचा उपयोग केला जातो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.