Hair care tips, how to use serum in hair
Hair care tips, how to use serum in hair ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

केसांना सीरम लावताय तर या गोष्टींची काळजी घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : केस वाढवण्यासाठी किंवा त्याची काळजी घेण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो. केसांच्या काळजीसाठी आपण नवनवीन तेलाचा वापर करत असतो.

हे देखील पहा -

आपण ऋतूमानानुसार केसांची काळजी घेत असतो. वाढत्या प्रदुषणामुळे (Pollution) जितके आपल्या शरीराला नुकसान होते तितकेच आपल्या केसांना ही होते. धूळ व हवेत असणाऱ्या केमिकल्समुळे आपल्याला केसांना हानी पोहोचते. प्रदूषणामुळे केस कोरडे किंवा तेलकट होऊ लागतात अशावेळी आपण केसांना सीरम लावतो. हेअर सीरम उन्हाळ्यात उष्णता आणि आर्द्रतेवर मात करण्यासाठी देखील फायदेशीर ठरते. केसांना सतत हेअर ड्रायर किंवा स्ट्रेनिंगचा वापर केल्यामुळे त्यातील तेल निघून जाते अशावेळी केसांचे तेल परत आणण्यासाठी हेअर सीरम फायदेशीर ठरेल. हेअर सीरमचा वापर कसा करावा हे जाणून घेऊया.

१. हेअर सीरम वापरण्यापूर्वी त्याची योग्य निवड करावी. सीरम निवडताना आपल्या केसांचा प्रकार लक्षात घ्या. रासायनिक प्रक्रिया केलेल्या केसांसाठी बाजारात वेगळे सीरमही उपलब्ध असतात. त्यामुळे केसांना पुन्हा नव्यासारखे रुप येईल.

२. बऱ्याच महिला केसांना चमक देण्यासाठी हेअर सीरम वापरतात. परंतु रुक्ष केसांना हेअर सीरम वापरणे फायदेशीर ठरत नाही. हेअर सीरम केसांना घाण आणि प्रदूषणापासून वाचवण्याचे काम करतात. ते लावण्यापूर्वी केस स्वच्छ धुवा आणि नंतर हेअर सीरम वापरा.

३. कोरडेपणा आणि खडबडीतपणा सामान्यतः केसांच्या टोकांना जास्त असतो. सीरम लावताना टाळूला आणि केसांच्या टोकांना व्यवस्थितरित्या लावावे.

४. ओल्या केसांना सीरम लावणे टाळा यामुळे केसांना (Hair) त्याचा फायदा होणार नाही. केसांना सीरम लावताना केस सुकवून घ्या मगच केसांना लावा त्यामुळे प्रदूषणापासून केसांचे संरक्षण होईल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah: रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने पराभूत होतील, अमित शाह यांचं भाकीत

Today's Marathi News Live : उध्दव ठाकरे यांच्या धाराशिव येथील सभेला मोठी गर्दी

Jammu Kashmir: काश्मीरमध्ये हवाई दलाच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवादी हल्ला

Prakash Ambedkar On Pm Modi | नरेंद्र मोदींना मौत का सौदार बोलणे योग्यच आंबेडकरांचं कॉंग्रेसशी एकमत

Bajarang Sonawane Viral Video | Beed येथे मराठा आंदोलकांनी बजरंग सोनवणे यांची गाडी अडवली! काय घडलं?

SCROLL FOR NEXT