मुंबई : नखे आपल्या हाताच्या सौंदर्यात भर घालतात. त्यांना सुंदर बनविण्यासाठी योग्य काळजी देखील घेणे आवश्यक आहे. त्यांची वेळोवेळी काळजी न घेतल्यास ते लगेच तुटात किंवा आतून कमकुवत होतात. तसेच ज्या लोकांना नखे चावण्याची सवय आहे, त्यांनी याची विशेष काळजी (Care) घ्यायला हवी. (Nail Care tips in Marathi)
हे देखील पहा -
नखांवर सतत नेल पेंट लावल्याने ते पिवळे पडतात. इतकेच नाही तर त्यांची चमकही कमी होऊ लागते. त्यांचा नैसर्गिक रंग कुठेतरी हरवून जातो. नखांचे सौंदर्य टिकवून ठेवायचे असेल तर नेलपेंट लावणे शक्यतो टाळावे याशिवाय नेल एक्स्टेंशन किंवा इतर ब्युटी प्रोडक्ट्स (Product) देखील आहेत, जे नखांना कमकुवत बनवण्याचे काम करतात.
नखे मजबूत आणि निरोगी ठेवायची असतील तर काही गोष्टी करणे टाळा. काहीवेळा या कारणांमुळे नखाभोवतीची त्वचा (Skin) देखील बाहेर पडते. त्यामुळे या गोष्टींपासून त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
कशी राखाल नखांची काळजी -
१. सतत नेल पेंटचा कोट लावू नका -
आपल्याला नखांवर डबल किंवा ट्रिपल नेल कोट लावण्याची सवय असते. अधूनमधून लावायला हरकत नाही, पण असे सतत केल्याने नखांची चमक निघून जाते. हलका कोट लावणे चांगले. यामुळे नेल पेंट लवकर सुकते आणि काढणेही सोपे होते.
२. लांब नखे असतील तर या चुका करू नका -
नखे लांब असतात तेव्हा त्याचा अनेक प्रकारे फायदा घेतला जातो. खरेतर झाकण काढण्यासाठी, कानातील घाण साफ करणे ह्या सर्व चुकीच्या सवयी आहेत. त्यामुळे नखे तुटण्याची भीती असते.
३. नखाभोवतीची त्वचा कापू नका -
क्युटिकल्स ही आपल्या नखांभोवतीची त्वचा असते जी कधीकधी कडक लागते. यामुळे त्वचा लाल होते आणि काहीवेळा सूज आणि दुखण्याची समस्या देखील सुरू होते. काही लोक हे क्युटिकल्स कापतात यामुळे समस्या आणखी वाढू शकते. त्यावर तुम्ही क्युटिकल रिमूव्हर लावल्यास तिथली त्वचा मऊ होते.
४. नेल विस्तारांपासून नखांचे संरक्षण करा -
नखे नैसर्गिकरित्या फार लांब नसल्यास आपण नेल एक्स्टेंशनचा अवलंब करतो. मात्र, यामुळे आपली नखे कमकुवत होतात. जेव्हा नखे किंचित लांब असतात, तेव्हा नेल एक्सटेंशनचा वापर करा. त्यामुळे नैसर्गिक नखांचे संरक्षण होईल.
अशाप्रकारे नखांची काळजी तुम्ही घेऊ शकता.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी आपल्या ब्युटिशियनशी संपर्क साधावा.
Edited By - Komal Damudre
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.