Summer Baby Care Saam Tv
लाईफस्टाईल

Summer Baby Care : वाढत्या तापमानात या 5 गोष्टींची घ्या काळजी, अनेक आजारांपासून राहाल लांब !

Baby Care Tips : या ऋतूमध्ये लहान मुलांची काळजी घेण्याचा विचार येतो तेव्हा आव्हान दुप्पट होते.

कोमल दामुद्रे

Summer Care Tips : वाढते तापमान व बदलत्या हवामानाचा मुलांच्या आरोग्यावर लगेच परिणाम होतो. या काळात प्रत्येकांने आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. या ऋतूमध्ये लहान मुलांची काळजी घेण्याचा विचार येतो तेव्हा आव्हान दुप्पट होते.

कडक उन्हामुळे लहान मुले (Child) अनेक आजारांना (Disease) सहज बळी पडतात. अशा परिस्थितीत पालकांची चिंताही स्वाभाविक आहे. प्रौढांप्रमाणेच या ऋतूत मुलांमध्येही डिहायड्रेशन, उष्माघात, जुलाब यासारख्या समस्या सामान्य होतात. अशा परिस्थितीत पालकांनी (Parents) लहान मुलांची चांगली काळजी घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. चला तर मग आज जाणून घेऊया लहान मुलांची उष्णतेवर मात करण्यासाठी कशी काळजी घेतली जाऊ शकते.

1. दूध

उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेसे पाणी (Water) पिण्याचा सल्ला दिला जातो. उष्णतेमुळे लहान मुलांच्या शरीरात पाण्याची कमतरता भासू शकते. अशा परिस्थितीत लहान मुलांना पाण्याव्यतिरिक्त आईचे दूधही द्यावे. यामुळे त्यांना आजारांशी लढण्याची ताकदही मिळेल.

बाल तज्ज्ञांच्या मते, सहा महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकांना उन्हाळ्यात दुधाची गरज आणखी वाढते. यासाठी आईने हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे जेणेकरून बाळाला योग्य प्रमाणात दूध मिळू शकेल. यासाठी मातांनी नियमितपणे पुरेसे पाणी प्यावे आणि थंड ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करावा.

2. लहान मुलांना घराबाहेर नेणे टाळा

तज्ज्ञांच्या मते, सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तीव्र सूर्यप्रकाश असतो. अशा परिस्थितीत लहान मुलांना चुकूनही घराबाहेर काढू नका. मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे आणि ते लवकर आजारी पडू शकतात. जर तुम्हाला ते बाहेर काढायचे असतील तर, हलक्या रंगाचे आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घाला, चेहरा संरक्षित करण्यासाठी टोपी घाला आणि उन्हापासून वाचण्यासाठी छत्री ठेवा. आजकाल बाजारात लहान मुलांसाठी सनस्क्रीन देखील उपलब्ध आहेत, ज्याचा वापर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता.

3. लहान मुलांना जास्त कपडे घालू नका

अनेक पालकांना लहान मुलांना भरपूर कपडे घालण्याची सवय असते. उन्हाळ्यातही ते मुलांना तीन थरांचे कपडे घालायला लावतात. असे करणे योग्य नसताना. या ऋतूत जास्त थरांचे कपडे घालणे टाळा.

4. योग्य बेबी बेड आणि स्ट्रॉलर निवडा

तुमचे बाळ जेथे झोपते किंवा सर्वात जास्त वेळ घालवते ती जागा आरामदायी पण थंड ठेवा. साटन किंवा गरम पत्रके देखील मुलाचे शरीर गरम करतील, या काळात सूती कपड्यांची निवड अधिक चांगली ठरेल. जेव्हा तुम्ही तुमच्या बाळासाठी स्ट्रॉलर खरेदी करता तेव्हा त्याच्या फॅब्रिककडे लक्ष द्या. त्याचे कापड नायलॉनसारखे हलके फॅब्रिकचे असावे.

5. बाळाला अधिक उष्णता सहन होत नाही हे कसे कळेल ?

लहान मुलांमधील घामाच्या ग्रंथी पूर्णपणे विकसित झालेल्या नसतात, त्यामुळे बाळाला कधी गरम होत आहे हे सांगणे तुमच्यासाठी कठीण होईल. अशा परिस्थितीत, हे सूचक तुम्हाला उपयोगी पडू शकतात-

  • मूल सुस्त किंवा सतत चिडचिड करते.

  • तुमच्या बाळाची त्वचा नेहमीपेक्षा कोरडी दिसते.

  • शरीरात दीर्घकाळापर्यंत पाण्याच्या कमतरतेमुळे, मूल दूध पिणे देखील बंद करते. जे अत्यंत निर्जलीकरणाचे लक्षण आहे.

  • जर मुलाने लघवी करणे थांबवले तर आपण ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT